बिकीनी वादानंतर Shah Rukh Khan का टाळतोय चित्रपटाचं ट्रेलर ? अखेर कारण समोर

दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकीनीमुळे 'पठाण' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; प्रेक्षक ट्रेलरच्या प्रतीक्षेत, पण शाहरुख का टाळतोय चित्रपटाचं ट्रेलर... कारण समोर

बिकीनी वादानंतर Shah Rukh Khan का टाळतोय चित्रपटाचं ट्रेलर ? अखेर कारण समोर
बिकीनी वादानंतर Shah Rukh Khan का टाळतोय चित्रपटाचं ट्रेलर ? अखेर कारण समोर
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 2:05 PM

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) स्टारर ‘पठाण’ चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘पठाण’ (pathan) चित्रपट 25 जानेवारी 2023 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दीपिका पादुकोणच्या ‘बेशर्म रंग’ गाण्यातील बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात अनेक राजकारणी आणि संघटनांनी आक्षेप घेतला, तर दुसरीकडे अनेक बॉलिवूडकरांनी होणाऱ्या वादाला विरोध केला.

चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यानंतर ‘झूमे जो पठाण’ गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. आता प्रेक्षक चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. पण चित्रपट प्रदर्शनाची तारीख तर प्रेक्षकांना कळाली आहे. पण अद्याप चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलेला नाही.

चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार या प्रतीक्षेत चाहते आहे. दरम्यान शाहरुख खानने #AskSRK सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. #AskSRK सेशनच्या माध्यमातून एका चाहत्याने ‘पठाण चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित करणार?’ असा प्रश्न विचारला.

चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख मजेशीर अंदाजात म्हणाला, ‘माझी मर्जी… तो तेव्हाच येईल जेव्हा त्याला यायचं असेल…’ अभिनेत्याच्या उत्तरानंतर चाहत्यांनी ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागेल असंच समोर येत आहे.

‘पठाण’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित ‘पठाण’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आशी चर्चा रंगत आहे. पण याबद्दल चित्रपटाच्या मेकर्सकडून कोणतही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Pathaan Release On OTT)

शाहरुख आणि दीपिका स्टारर ‘पठाण’ सिनेमा 2023 मध्ये मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पठाण’ सिनेमाचे डीजिटल राईट्स 200 कोटी रुपयांमध्ये रिर्झव्ह करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.