Shah Rukh Khan Birthday : शाहरूख नव्हे, बॉलिवूडच्या बादशाहाचं खर नाव आहे वेगळंच, तुम्हाला माहीत आहे का ?

Shah Rukh Khan Real Name : शाहरुख खान... हे नाव घेतलं की लाखो चाहत्यांच्या चेहऱ्यावर सुरेख हास्य फुलतं. या नावाला वेगळ्या ओळखीची काही गरज नाही. पण जे नाव देशभरातच नव्हे तर जगभरातील घराघरांत पोहोचलंय, त्या सुपरस्टारचं खरं नाव शाहरुख नाहीये... अस तुम्हाला कोणी सांगितलं तर ? शाहरुखचं खरं नाव काय तुम्हाला माहीत आहे का ?

Shah Rukh Khan Birthday : शाहरूख नव्हे, बॉलिवूडच्या बादशाहाचं खर नाव आहे वेगळंच, तुम्हाला माहीत आहे का ?
शाहरुखचं खरं नाव काय ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 8:20 AM

बॉलिवूडचा बादशाह, किंग खान शाहरूख आज ( 2नोव्हेंबर) त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करतोय. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणार हा सुपरस्टार आजही तितकाच लोभस, हृदयाचा ठाव घेणारा आहे हे निश्चित. त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर गर्दी करून तासतनतास ताटकळत उभे असतात. त्याची सिग्नेचर पोझ आणि एक स्माईल दिसली की दिवसाचं सार्थक होतं अंशी अनेकांची भावना आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अजरामर भूमिका करणाऱ्या शाहरूखचं नाव देशभरातच नव्हे तर जगभरात पोहोचलं असून त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. शाहरुखला वेगळ्या ओळखीची गरज नाही. पणजे नाव कोट्यवधी चाहत्यांच्या तोंडी असतं ते त्याचं खरं नाव नाहीच, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का ? हो, हे खरं आहे, अभिनेता शाहरूख खानचं खर नाव काही वेगळंच आहे… तुम्हाला माहीत आहे का त्याचं खरं नाव ?

शाहरुखचं मूळ नाव काही वेगळंच आहे, त्याच्या आजीने त्याचं नाव दुसरंच ठेवलं होतं. मात्र ते नाव कुठेच रजिस्टर झालं नाही आणि नंतर ते ( नाव) बदलण्यात आलं. याचा खुलासा खुद्द शाहरूख यानेच केला होता. शाहरुख हा अभिनेता अनुप खेर यांच्या द अनुपम खेर शो च्या एका भागात आलेला असतानाच बोलता बोलता त्याने त्याच्या नावाचा गौप्यस्फोट केला. तू अब्दुल रेहमान नावाच्या एका व्यक्तीला ओळखतोस का ? असा प्रश्न या शो दरम्यान अनुपम खेर यांनी त्याला विचारला होता.

आजीने ठेवलं होतं नाव

अनुपम खेर यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने त्याचं खर नाव सांगितलं. आधी माझं नाव शाहरुख नव्हे तर अब्दुल रहमान असं होतं. मी अशा कोणत्याही व्यक्तीला तर ओळखत नाही पण माझी आजी (आईची आी), तिला आम्ही पिश्नी म्हणायचो, माझ्या लहानपणी तिने माझं नावं अब्दुल रहमान असं ठेवलं होतं. पण त्या ची कुठेच नोंद ( रजिस्टर) झाली नाही. पण माझं नाव अब्दुल रहमान असं असाव अशी तिची इच्छा होती. आता तुम्हीच विचार करा की बाजीगर वगैरे चित्रपटात बाझीगर स्टारिंग अब्दुल रहमान… असं लिहीलेलं बरं दिसतं का ? स्टारिंग शाहरुख खान इन अँड ॲज.. असं नाव चांगलं दिसतं ना, असं शाहरुख म्हणाला.

वडिलांनी का ठेवलं शाहरुख नाव ?

त्यानंतर अनुपम खेर यांनी पुढे विचारले की मग तुझं नाव कोणी बदललं ? त्यावर शाहरुख खान म्हणाला – ‘माझ्या वडिलांनी माझं नाव बदलले, त्यांनी माझ्या बहिणीचे नाव लाला रुख ठेवले जे एका खूप मोठ्या कवितेवर आधारित आहे आणि त्यांच्याकडे एक घोडा होता, त्याचे नाव देखील लाला रुख होते. त्यांना असं वाटलं की माझं नाव शाहरुख असं असावं, त्याचा अर्थ आहे राजकुमारासारखा चेहरा…

शाहरुखचं काम

अभिनेता शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो काही महिन्यांपूर्वी प्रदर्शि झालेल्या डंकी चित्रपटात तो दिसला होता. सध्या तो ‘द किंग’ या चित्रपटाच्या तयारीत असून त्यामध्ये त्याची लेक सुहाना खानही झळकणार आहे.

बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...