मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : सध्या सर्वत्र शाहरुख खानच्या ‘जवान’ याच चित्रपटाची चर्चा आहे. अटली दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 120 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाचं जोरदार कौतुक होत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर शाहरुख आणि ‘जवान’साठी पोस्ट लिहित आहेत. अशातच ‘कांटे’, ‘काबिल’, ‘शूटाऊट ॲट लोखंडवाला’, ‘शूटाऊट ॲट वडाला’ आणि ‘जज्बा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी शाहरुखबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. संजय यांनी शाहरुख आणि अंडरवर्ल्डबद्दल हे ट्विट केलं आहे.
संजय यांनी ट्विट करत लिहिलं, ‘मी जवान हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर मला हा किस्सा सांगावासा वाटतोय. नव्वदच्या दशकात जेव्हा फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींवर अंडरवर्ल्डचा दबाव होता, त्यावेळी शाहरुख खान हा एकमेव कलाकार होता, ज्याने कधीच हार मानली नाही. गोळी घालायची असेल तर घाला, पण तुमच्यासाठी मी काम करणार नाही. मी पठाण आहे’, असं तो स्पष्ट म्हणायचा. तो आजही तसाच आहे. ‘जवान’ हा चित्रपट पाहिल्यानंतर फक्त संजय गुप्ताच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी शाहरुखचं कौतुक केलं. यात अभिनेत्री कंगना रनौत, टायगर श्रॉफ, महेश बाबू, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचाही समावेश आहे.
I saw JAWAN.
I feel compelled to share this.
Back in the 90’s when the underworld bullying of the film stars was at its peak @iamsrk was THE ONLY star who never gave in.
“Goli marni hai mar do, par tumhaare liye kaam nahin karoonga. Main Pathan hoon.” He said.
He’s the same…— Sanjay Gupta (@_SanjayGupta) September 9, 2023
सोशल मीडियावर सध्या ‘जवान’चाच बोलबाला आहे. अशातच महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हेसुद्धा त्याच्याबद्दल ट्विट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. आनंद महिंद्रा यांनी नुकतंच ट्विट करत शाहरुख खानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आपल्या या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी सुचवलं की शाहरुख खानला त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना आपल्या चित्रपटाद्वारे एकत्र आणण्याच्या क्षमतेमुळे त्याला नैसर्गिक संसाधन म्हणून घोषित केलं जावं.