शाहरुख थुंकला की फुंकर ? मोदींचा फोटो ट्विट करत ऊर्मिला मार्तोंडकर म्हणतात, सबको सन्मती दे भगवान !
श्रध्दांजली वाहण्यासाठी रणबीर कपूर, जावेद अख्तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनुराधा पौडवाल, राहुल वैद्य, विद्या बालन, राज ठाकरे इत्यादी मान्यवर हजर होते.
मुंबई – रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकरांनी (lata mangeshkar) ब्रीचकॅन्डी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी वा-यासारखी अवघ्या जगात पसरली. लोकांनी त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली. तसेच अनेक नेत्यांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मुंबईत (mumbai) आले होते. त्यांच्यावरती शिवाजी पार्क (shivaji park) येथील मैदानात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथं अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी तिथं लता दीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या शाहरूख खान (shahrukh khan) आणि पूजा ददलानी सुध्दा आल्या होत्या. शाहरूख खान आणि पूजा ददलानी हे दोघेही स्टेजवरती पार्थिवाला श्रध्दांजली वाहण्यासाठी एकत्र चढले. पहिल्यांदा शाहरूख खानने प्रार्थना केली आणि वाकून पार्थिव शरिरावर फुंकर मारली, त्यानंतर पुजा दललानीसोबत हात जोडून प्रदक्षिणा घालून खाली स्टेजवरून खाली उतरला. हा व्हीडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
VIDEO : Raj Thackeray यांनी वाहिली Lata Mangeshkar यांना आदरांजली | Lata Didi | Dadar Shivaji Park #LataMangeshkar #LataDidi #लतामंगेशकर #लतादीदी #RIP_LataDidi
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/EG9RycPyWE
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2022
पार्थिवावर शाहरूख थुंकला असल्याची चर्चा
शाहरूखच्या श्रद्धांजलीच्या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून लता मंगेशकरांच्या पार्थिवावर शाहरूख थुंकला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसेच नेटक-यांच्या चर्चेमध्ये हेही सुरू आहे की, एका आदरणीय व्यक्तीच्या पार्थिवावर थुंकणं कसं शक्य आहे, असेही अनेकांनी म्हणटले आहे. शाहरूख खानने दुआचे पठण केल्यानंतर मारली होती. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. नेटकर-यांच्या चर्चेमध्ये शाहरूख खानला अनेकांनी मुद्दाम असं कृत्य केल्याचे सुध्दा म्हणटले आहे.
नेटक-यांना उर्मिला मातोंडकरांचं प्रत्युत्तर
थूकना नही दुआओं को फुँकना कहते हैं।इस सभ्यता,संस्कृति को #भारत कहते हैं। प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता। भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें “ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान” (आज का दिन तो छोड़ देतें??) https://t.co/fjmUWor9Fh pic.twitter.com/c6tkhiEK1d
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 6, 2022
“याला थुंकणे नाही, फुंकणे म्हणतात. या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात. पंतप्रधानांचा फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे होते. भारत मातेच्या मुलीचे गाणे ऐका ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान.’ आजचा दिवस तरी सोडायचा होता,” असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. असं ट्विट उर्मिला मातोंडकरांनी केलं असून नेटक-यांना चांगलं सुनावलं आहे. तसेच पंतप्रधानांकडून काहीतरी शिका असाही सल्ला त्यांनी नेटक-यांना दिला आहे.
शाहरूखचं कौतुक
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक देखील केलं आहे. तसेच असं काम फक्त राजाचं करू शकतो असं काही नेटकर्यांनी म्हणटलं आहे. श्रध्दांजली वाहण्यासाठी रणबीर कपूर, जावेद अख्तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनुराधा पौडवाल, राहुल वैद्य, विद्या बालन, राज ठाकरे इत्यादी मान्यवर हजर होते.