रमजानच्या महिन्यात मुस्लिम अभिनेता पोहोचला तिरुपती मंदिरात, फोटो पाहून धर्म रक्षक संतापले
अभिनेता शाहीर शेख हा नुकताच तिरुपतीला गेला होता. रमजानच्या महिन्यात त्याला तिरुपतीला जाताना पाहून मुस्लिम धर्म रक्षक संतापले आहेत.

‘दो पत्ती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता शाहीर शेख याने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याची प्रत्येत भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘महाभारत’ ही शाहीरच्या अनेक सुपरहिट मालिकांपैकी एक आहे. 13 वर्षांपूर्वी शाहीरने सिद्धार्थ कुमार तिवारीच्या ‘महाभारत’ या पौराणिक नाटकात अर्जुनची भूमिका साकारली होती. अलीकडेच, शाहीर शेखसह महाभारताची संपूर्ण टीम तिरुपती मंदिरात दर्शन करताना दिसली होती. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. रमजानच्या महिन्यात शाहीर तिरुपतीला गेल्यामुळे मुस्लिम धर्म रक्षक संतापले आहेत.
काय आहेत फोटो?




काही धार्मिक रक्षकांना शाहीरचे रमजान महिन्यात तिरुपतीला जाणे खटकले आहे. त्यामुळे त्यांनी या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिरुपती मंदिराबाहेरील फोटो शाहीर शेखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्यासोबत सौरव गुर्जर, अहम शर्मा, अर्पित रांका आणि ठाकूर अनूप सिंग देखील दिसत आहेत. या चित्रांमध्ये शाहीर मुंडू (दक्षिण भारतीय धोतर आणि शर्ट) परिधान केलेला दिसत आहे. शाहीरसोबत ‘महाभारत’ मालिकेतील धृतराष्ट्राची भूमिका साकारणाऱ्या ठाकूर अनुप सिंह यांनीही टीमसोबतचा एक फोटो शेअर करताना एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
अनुप सिंह यांनी शेअर केले फोटो
ठाकूर अनुप सिंह यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, “आमची महाभारत मालिकेची गँग तिरुपतीमध्ये काही सुंदर आठवणी गोळा करत आहे. खरं तर, आम्ही जास्त भेटत नाही. सहा महिन्यांतून किंवा कधी कधी वर्षातून एकदा भेटतो. पण, ही छायाचित्रे आमच्या नात्याचा पुरावा आहेत. आम्ही एकमेकांच्या आरोग्याविषयी नेहमीच अपडेट असतो. जेव्हाही आम्ही भेटतो तेव्हा आमच्यातील ऊर्जा आश्चर्यकारक असते. या 13 वर्षांनी एकमेकांना जवळ आणले आहे. माझ्या सर्व मित्रांना शुभेच्छा आणि लवकरच भेटू अशी आशा करतो.”
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
शाहीरने रमजानच्या महिन्यात अशा प्रकारे तिरुपती मंदिरात जाणे अनेकांना आवडले नाही. अनेक धार्मिक लोकांनी शाहीरचे वागणे चुकीचे मानले आणि सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. शाहीरच्या फोटोवर एका यूजरने कमेंट करत, ‘रमजानच्या महिन्यात उपवास करण्याची गरज नाही का?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘रमजानच्या पवित्र महिन्यात तिरुपतीला जाऊ नये’असा सल्ला दिला आहे.’ नेहमीप्रमाणे शाहीरने त्याला ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.