Shahid Kapoor : लिपलॉकच्या फोटोवर पहिल्यांदाच बोलला शाहिद कपूर, म्हणाला मी उद्ध्वस्त..

किस करतानाचे ते फोटो व्हायरल झाल्यावर आपली स्थिती कशी होती, याबद्दल शाहीदने आता खुलासा केला आहे. तेव्हा मला वाटत होतं की मी अक्षरश: बरबाद...

Shahid Kapoor : लिपलॉकच्या फोटोवर पहिल्यांदाच बोलला शाहिद कपूर,  म्हणाला मी उद्ध्वस्त..
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 5:07 PM

Shahid Kapoor On Viral Kiss Photos : शाहिद कपूर (Shahid kapoor) हा आजच्या काळात बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. मात्र जेव्हा त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती, जिचा त्याच्या आयुष्यावर आणि कारकिर्दीवरही परिणाम झाला होता. खरंतर तेव्हा शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) एकमेकांना डेट करत होते आणि त्यांच्या लिपलॉकचे फोटो (kissing photos) प्रचंड व्हायरल झाले होते. त्या फोटोंमुळे मोठी खळबळही माजली होती. मात्र ते फोटो फेक होते, असाच स्टँड शाहिदने नेहमी घेतला होता.

ते फोटो समोर आले तेव्हा शाहिद कपूर अवघा 24 वर्षांचा होता. त्या घटनेनंतर त्याच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याबाबत शाहिदने आता मौन सोडले आहे. इतक्या वर्षानंतर तो या विषयावर बोलला आहे. ” त्यावेळी मी उद्ध्वस्त झालो होतो. मी फक्त 24 वर्षांचा होतो. माझी प्रायव्हसी अफेक्ट झाली अन् रक्षण करण्यासाठी मी काहीच करू शकलो नाही, अशा भावना त्यावेळी माझ्या मनात होत्या,” असे शाहिदने नमूद केले.

हे सगळं काय झालं आणि का झालं याचाच मी विचार करत होते. या सर्वाचा माझ्यावर, करीअरवर काय परिणाम होईल, याचीच मला चिंता होती. ते वय असं असतं ना की तुम्हाला तुमच्या भावना धड समजत नाहीत, मुलगी सोबत असताना, डेट करताना कसं रहायचं, कसं वागायचं, याचा आपण विचार करतो, तेव्हा अशा घटना घडतात, असं शाहिद म्हणाला.

आता माझ्या आयुष्यात रस नाही

आता माझं लग्न झालंय, मुलंही आहेत मला . त्यामुळे आता माझ्या आयुष्यात कोणालाही रस नाही, अस शाहिद म्हणाला. आता २४ वर्षांचे इतरही लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात इतरांना रस असू शकतो, असे त्याने सांगितले.

करिअरच्या सुरुवातीला शाहिद कपूर हा करीना कपूरला डेट करत होता. त्यादरम्यान दोघांनी जाहीरपणे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, 2007 मध्ये दोघांचे नाते तुटले आणि दोघेही वेगळे झाले. नंतर करीना कपूर ही सैफ अली खानसोबत सेटल झाली तर शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केलं.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.