‘विवाह’ चित्रपटातील ‘पुनम’ आणि ‘प्रेम’ने सर्वांना लावलेलं वेड, आता अशी दिवस काढतेय ‘ती’ अभिनेत्री!

| Updated on: May 02, 2023 | 11:52 PM

Vivah Actress Amrita Rao : विवाह चित्रपटात शाहिद कपूरसोबत अमृता रावची जोडी खूप गाजली होती. अमृताने शाहरुख खानच्या चित्रपटातही काम केले आहे. पण ते आता कुठे आहेत, माहीत आहे का?

विवाह चित्रपटातील पुनम आणि प्रेमने सर्वांना लावलेलं वेड, आता अशी दिवस काढतेय ती अभिनेत्री!
Follow us on

मुंबई : ‘विवाह’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षक तेवढ्याच आवडीने पाहतात. या चित्रपटात पुनम आणि प्रेमची जोडी चांगलीच गाजली होती. तर प्रेम ही भूमिका अभिनेता शाहिद कपूरने साकारलेली तर पुनमची भूमिका अभिनेत्री अमृता रावने साकारलेली. या चित्रपटातून शाहीद कपूर आणि अमृता रावने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं.

2006 साली प्रदर्शित झालेला ‘विवाह’ हा चित्रपट आजही लोकांना आवडतो. शाहिदसोबतच अमृता रावलाही या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 17 वर्षे झाली आहेत. तर शाहिद कपूर अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, परंतु अमृता राव सक्रिय नसून आता ती कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.

या चित्रपटातून केलं होतं पदार्पण

2002 मध्ये अमृता रावने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  ‘अब के बरस थी’ हा तिचा पहिला चित्रपट होता.  त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2004 मध्ये अमृता शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिनं महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.

अमृता राव आता कुठे आहे?

विवाह आणि मैं हूं ना यांसारखे सुपरहिट चित्रपट केल्यानंतर अमृता रावने आणखी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर तिनं दक्षिणेतही अनेक चित्रपट केले आणि टीव्ही रिअॅलिटी शोमध्येही काम केले होते. मात्र, सध्या ती बॉलिवूडपासून दूर असून मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करताना दिसत आहे. तसंच कपल ऑफ थिंग्स या नावाने अमृताचे पुस्तकही आले आहे.

आरजे अनमोलशी केले लग्न

अमृता रावने आरजे अनमोलसोबत लग्न केले आहे. असं म्हटलं जातं की, अमृता आणि अनमोल लग्नाआधी अनेक वर्षे एकमेकांना डेट केरौ होते, त्यानंतर 2016 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं.

सोशल मीडियावर आहे सक्रिय

अमृता राव जरी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहते. ती नेहमी तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते.  ती इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसंच तिचे इंस्टाग्रामवर 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.