शाहरूख खानने धाकटा मुलगा अबरामसह चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा; असंख्य चाहत्यांची मन्नतबाहेर गर्दी

| Updated on: Jul 10, 2022 | 10:27 PM

ईदच्या शुभेच्छा देताना शाहरुख खानच्या फॅन क्लबने ट्विटरवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्याप्रमाणे लोक शाहरूखच्या शुभेच्छांची वाट बघत असतात त्याचप्रमाणे लोकांनीही ट्विटरवरून शाहरुख खानला शुभेच्छा देत आहेत.

शाहरूख खानने धाकटा मुलगा अबरामसह चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा; असंख्य चाहत्यांची मन्नतबाहेर गर्दी
Follow us on

मुंबईः ईद (eid-al-adha)सण जवळ आला की, शाहरुख खानच्या (Shaharukh khan)चाहत्यांना त्याच्याकडून दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांची चाहूल लागते. अभिनेता शाहरूख खाननेही शुभेच्छा देण्यामध्ये कधी खंड पडू दिला नाही. त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर (Mannat Banglow) येऊन त्याने चाहत्यांच्या बाजूने हात उंचावून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या की मग चाहतेही खूष होऊन जातात. यावेळच्या ईदच्यानिमित्तानेही शाहरूख खानने त्याच्या मन्नत या बंगल्याच्या छतावर चढून लोकांना अभिवादन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 धाकटा मुलगा अबरामकडूनही शुभेच्छा

दरवेळेप्रमाणे यावेळीही शाहरुखने चाहत्यांना निराश केले नाही. 2022 च्या ईद-अल-अधानिमित्त, बॉलिवूड मेगास्टार शाहरुख खान त्याच्या मुंबईतील घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराच्या टेरेसवर आला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा धाकटा मुलगा अबराम (अब्राम खान) देखील होता,त्यादरम्यान शाहरुखने डेनिमसह पांढरा टी-शर्ट कॅरी केला होता. तर त्याचा मुलगा अबरामने काळ्या रंगाच्या पॅन्टसह लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसून आला होता.

 

 चाहत्यांचे स्वागत

शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अबराम खान यांनी हस्तांदोलन करून मन्नतच्या बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांचे स्वागत केले. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी शाहरुखने त्याचा मुलगा अबराम खानला किस करताना दिसत आहे.

 

 ट्विटरवरून शाहरुख खानला शुभेच्छांचा पाऊस

ईदच्या शुभेच्छा देताना शाहरुख खानच्या फॅन क्लबने ट्विटरवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्याप्रमाणे लोक शाहरूखच्या शुभेच्छांची वाट बघत असतात त्याचप्रमाणे लोकांनीही ट्विटरवरून शाहरुख खानला शुभेच्छा देत आहेत. शाहरुख खानने नुकतीच फिल्म इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत.नुकतेच शाहरुख खानने इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह सेशनदेखील केले होते, त्यामध्ये त्याने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली होती.