गौरी नवरा शाहरुख खानचे सर्व चित्रपट फ्लॉप होण्याची देवाकडे सतत प्रार्थना का करायची?
शाहरूख खानची पत्नी गौरी खान शाहरूखचे सर्व चित्रपट फ्लॉप व्हावे यासाठी रोज देवाला प्रार्थाना करायची. तिला शाहरूखचे चित्रपटांमधील काम पाहणे देखील आवडत नव्हते. तिने यामागील अनेक कारणे सांगितली आहेत. पण गौरी खानने स्वत:च केलेल्या खुलासामुळे सर्वांनाच धक्का बसला.
शाहरुख खानला बॉलिवूडची शान मानलं जातं. शाहरूखने त्याच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख बनवली आहे. करोडो दिलोकी धडकन म्हणजे शाहरूख खान आहे. शाहरूख खानचे चित्रपट पाहायला सगळेच उत्सुक असतात.
तर त्याचे चित्रपट हे हीट व्हावे यासाठी अनेकजण प्रार्थनाही करत असतात. पण तुम्हाला माहितीये का की शाहरूखची पत्नी गौरी खान ही मात्र शाहरूखचे चित्रपट फ्लॉप व्हावे यासाठी चक्क प्रार्थना करायची.
शाहरुखचे चित्रपट फ्लॉप व्हावेत अशी प्रार्थना करायची गौरी
गौरी खान आणि शाहरुख खान हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहे. त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही ना काही गोष्टी नेहमीच चर्चेत राहतात. ही जोडी या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. एका मुलाखती दरम्यान गौरी खानने एक धक्कादायक गोष्ट सांगितली होती. तिने सांगितले होते की, शाहरुखचे सगळे चित्रपट फ्लॉप व्हावेत अशी ती नेहमी प्रार्थना करायची.
हे विचित्र वाटेल, पण हे खरे आहे. आपला नवरा कधीही यशस्वी होऊ नये असंच गौरी खानला वाटायचं. गौरीने यामागचे कारण सांगितले की तिला शाहरुखचे चित्रपटाती काम आवडत नव्हते. तिच्या माहेरी देखील हे पसंत नव्हते. पण तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या कुटुंबातील सर्वजण त्यांचे चित्रपट पाहायला जायचे. हळूहळू सर्वजण शाहरुखच्या यशासाठी शुभेच्छा देऊ लागले. पण तिचा नेहमीच विरोध होता. असही तिने सांगितले.
“मुंबईत जुळवून घेताना खूप त्रास होत होता”
पुढे गौरीने सांगितले की,” शाहरुख खानला इंडस्ट्रीत येऊन नऊ वर्षे झाली होती. सुरुवातीला त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. शाहरुख नुसत्या अभिनयावर कधीच समाधानी नव्हता. त्याला चित्रपटांच्या तांत्रिक बाबींमध्येही सहभागी व्हायचे होते. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला मुंबईत जुळवून घेताना खूप त्रास होत होता. पण शाहरुखसाठी सिनेमाच सर्वस्व होता. काही दिवस बघू, मुंबईत जर येऊन काही हाती लागले नाही तर दिल्लीला परत जायचं, असं आमचं ठरलं होतं. यासाठी त्याचे चित्रपट फ्लॉप व्हावेत अशी मी देवाला प्रार्थना करायचे याचं एकमेव कारण होतं. मला वाटायचं की असे झाले तर तो पुन्हा दिल्लीला येईल.”
शाहरूखचे कामही पाहिलं नव्हतं.
गौरीने पुढे म्हटलं “त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप व्हावेत म्हणून मी देवाला वारंवार प्रार्थना करायचे. मला मुंबईत अडचणी येत होत्या, मला परत दिल्लीला जायचं होतं. मात्र याच काळात त्याचे दिवाना आणि बाजीगर हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. पण हे चित्रपट देखील फ्लॉप व्हावेत अशीच माझी इच्छा होती. या चित्रपटांमध्ये त्याने कोणत्या प्रकारचे काम केले आहे हेही मी पाहिलेले नाही. पण माझी प्रार्थना पूर्ण झाली नाही. शेवटी मला मुंबईतच राहावे लागले. मी स्वतःला जुळवून घेतलं.” शाहरूखचे चित्रपट फ्लॉप का व्हावेत असं तिला वाटायचं यामागचं कारण गौरीने स्पष्ट केलं. पण आता गौरी खान आणि शाहरुख खान ही जोडी हीट असून दोघेही एकमेकाच्या यशासाठी आणि कामासाठी नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात.