‘ॲनिमल’ मधील ‘त्या’ सीनवेळी तृप्ती डिमरीची वाईट अवस्था; म्हणाली “रणबीरसमोर मला …”
‘ॲनिमल’ चित्रपटानंतर तृप्ती डिमरीचे नशीबच पलटले. पण या चित्रपटातील अनेक असे सिन्स आहेत जे करण्यात तिला फार अडचणी आल्या. तिने एका सीनचा किस्सा सांगतं रणबीर तिच्याशी त्यावेळी कसा वागला याबद्दल खुलासा केला आहे.
2023 मध्ये एका चित्रपटाची खूप चर्चा झाली तो म्हणजे ‘ॲनिमल’. संदीप रेड्डी वांगा यांच्या या चित्रपटाची, त्यातील सीन्सची, गाण्याची सर्वच गोष्टींची प्रचंड चर्चा झाली. पण या चित्रपटानंतर सर्वांच्याच करिअरला एक वेगळीच ओळख मिळाली. त्यातील एक चेहरा जास्त प्रसिद्ध झाला तो म्हणजे तृप्ती डिमरी.
‘ॲनिमल’चित्रपटानंतर तृप्ती डिमरीचे नशीबच पलटले.
‘ॲनिमल’चित्रपटानंतर तृप्ती डिमरीचे नशीबच पलटले. त्या चित्रपटानंतर ती भाभी 2 म्हणून सर्वांची क्रश बनली. संदीप रेड्डी वंगा यांच्या 2023 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्रीने रणबीर कपूरसोबत काम केले होते.
अलीकडेच एका मुलाखतीत तृप्ती डिमरीने चित्रपटाचा अनुभव आणि रणबीर कपूरसोबत तिचा काम करण्याचा तिने अनुभव सांगितला. ‘ॲनिमल’मध्ये असे अनेक सीन्स आहेत जे करण्यासाठी तिला फार अडचणी येत होत्या. पण त्यावेळी रणबीरने तिला कशी साथ दिली याबद्दल सांगितले.
कन्फेशन सीन शूट करताना खूप अडचणी आल्या
यातील एका सीनबद्दल तिने सांगितले. तो सीन म्हणजे कन्फेशन सीन. हा कन्फेशन सीन शूट करताना खूप अडचणी आल्याचेही तिने सांगितले. या सीन दरम्यान तिला रडायचे होते पण तिला रडायलाच येत नव्हते आणि ती तिच्या ओळीही विसरत होती. त्यावेळी रणबीरने काय केले याबाबत तिने सविस्तर सांगितले आहे.
रणबीरसमोर अभिनय करत असल्यामुळे तिच्यावर खूप दडपण होते. त्या दिवशी तिला तिच्या ओळी आठवत नव्हत्या. एका मुलाखतीदरम्यान तृप्ती डिमरी या सिनबद्दल सांगताना म्हणाली की, ‘सिनेमात माझ्या कन्फेशनचा एक सीन आहे. ज्यात मी रणबीरसमोर माझा खरा हेतू काय होता हे सांगते. त्या सीनचं मला खूप दडपण आलं होतं. यामुळे मला माझे वाक्यही आठवत नव्हते.
“रणबीर कपूरने माझा स्ट्रगल पाहिला अन्…”
तसंच तेव्हा मी दुसऱ्या सिनेमाचंही शूट करत होते त्यामुळे माझी झोपही नीट झाली नव्हती. ॲनिमलमध्ये माझा तो मोनोलॉग होता आणि वाक्य आठवण्यासाठी माझा स्ट्रगलच सुरु होता. इतर वेळी मला सीनसाठी लगेच रडायला यायचं पण त्या सीनमध्ये रणबीरसमोर मला जमतच नव्हतं”
तृप्तीने दिले अनेक टेक
पुढे तिने या सीन्सवेळी तिची अवस्था काय झाली होती त्याबद्दल सांगितलं, “रणबीर कपूरने पाहिले की मी स्ट्रगल करत आहे आणि मग त्याने मला खूप साथ दिली. तो मला येऊन म्हणाला, तृप्ती, कोणता शॉट आधी घ्यायचा? माझा क्लोज की तुझा क्लोज? तू सांग, आम्ही त्याच पद्धतीने सीन करू.’ हे सांगताना तृप्ती म्हणाली की ती भलेही तिचं सर्वोत्तम देऊ शकली नाही, तरीही रणबीर किंवा संदीप रेड्डी वांगा यांनी तिला वाईट वाटू दिले नाही.किंवा तिच्यामुळे वेळ जात होता हेही त्यांनी तिला जाणवू दिलं नाही. तृप्तीने पुढे सांगितले की तिने अनेक टेक दिले आणि शेवटी ती सीन करण्यात यशस्वी झाली.
रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.