म्हणून शहनाज गिलने सलमान खानचा फोन नंबर केला ब्लॉक, अभिनेत्रीने सांगितला किस्सा …

Shehnaaz Gill : एकेकाळी पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून मिरवणाऱ्या शहनाज गिलने आता स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती लौकरच किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. हा चित्रपट तिला कसा मिळाला या रंजक किस्सा तिने सांगितला.

म्हणून शहनाज गिलने सलमान खानचा फोन नंबर केला ब्लॉक, अभिनेत्रीने सांगितला किस्सा ...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 2:10 PM

मुंबई : बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून आल्यापासूनच शहनाज गिल (Shehnaaz gill) आणि सलमान खान (Salman khan) यांचा वेगळाच बॉंड आहे. त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. शहनाज आता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या शहनाज आणि सलमानसह संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या संदर्भात टीम नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती. यादरम्यान शहनाजने एक खुलासा केला, जो ऐकून सगळेच हैराण झाले.

सलमान आणि शहनाजचा चांगला बाँड असला तरी तिने एकदा खुद्द सलमानचाच फोन नंबर ब्लॉक केला होता. हो, हे खरं आहे. कॉमेडी शोमध्ये कपिल शर्माशी संवाद साधताना खुद्द शहनाजनेच हा खुलासा केला. हा तेव्हाचा किस्सा आहे, जेव्हा सलमानने तिला ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये एक भूमिका ऑफर करण्यासाठी बोलावले होते.

Truecaller वर शहनाजने चेक केला नंबर

हे सुद्धा वाचा

याबद्दल शहनाज म्हणाली, ” मी तेव्हा अमृतसरमध्ये होते. मी गुरुद्वारेत गेले होते, तेव्हा मला एका अनोळखी नंबरवरून (Unknown Number) कॉल येत होता. शहनाज म्हणाली की, मला तिला अनोळखी नंबर ब्लॉक करण्याची सवय आहे. त्यामुळे तो नंबर अनोळखी नंबर मी लगेच ब्लॉक केला. काही मिनिटांनंतर मला एक मेसेज आला की, सलमान तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतरही त्यावर शहनाजचा विश्वास बसला नाही आणि तो नंबर तिने Truecaller ॲपवर चेक केला. आणि तो नंबर खरंच सलमान खानचा आहे, हे तिला समजलं. ”

त्यानंतर शहनाजने लगेचच सलमानचा नंबर अनब्लॉक करून त्याला परत कॉल केला. तेव्हा सलमानने तिला ‘ किसी का भाई किसी का जान’ चित्रपटात रोल ऑफर केला आणि अशा प्रकारे तिला बॉलिवूड डेब्यू प्रोजेक्ट मिळाला.

सलमानसोबत काम करताना नर्व्हस नव्हती शहनाज

दरम्यान काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. तेव्हा शहनाजने सांगितले होते की, चित्रपटात काम करताना ती अजिबात नर्व्हस झाली नाही. ती म्हणाली, फायनल आऊटपुटमध्ये ती कशी दिसेल, ते पाहून तिला छान वाटलं. स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहून मला खूप छान वाटलं. तुम्हाला तर माहीत आहेच, माझं स्वत:वर किती प्रेम आहे ते ! त्यानंतर सलमान सर आणि बाकी सर्वांचा नंबर येतो.

किसी का भाई किसी का जान चित्रपटाची स्टार कास्ट

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान, शहनाज गिल या दोघांसह पूजा हेगडे, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, जस्सी गिल आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.