मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या घरात क्वारंटाइन (Home Quarantine) आहे. सध्या शिल्पाच्या घरात कोरोनानं कहर केला आहे. शिल्पा शेट्टीनं स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. त्यानंतर आज तिनं एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत तिनं आपण नवऱ्याला किती मिस करतोय हे सांगितलं आहे. कोरोनाचा कहर आता बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शिल्पा शेट्टीनं सांगितलं की तिची सासू तिच्या घरी कोरोना पॉझिटिव्ह येताच त्यानंतर समीषा, विवान आणि तिची आई कोरोना चाचणी सकारात्मक आली.
पाहा फोटो
आता तिनं राज कुंद्रासोबत स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती काचाजवळ उभी आहे. त्या काचेच्या दुसर्या बाजूला राज उभा आहे, दोघंही प्रेमळ डोळ्यांनी एकमेकांकडे पाहात आहेत. राज कुंद्रा आणि शिल्पाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना शिल्पा शेट्टीनं ‘कोरोना दरम्यान प्रेमाची वेळ !!’ या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘कोरोना प्यार हैं… सर्वांचे आभार.’
शिल्पाच्या या नवीन पोस्टवरून असं दिसून आलं आहे की, तिचा पती कोरोनातून आता बरा झाला आहे, त्यामुळे तिनं सर्वांचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ती टेन्शनमध्ये होती. कारण तिच्या मुलांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. शिल्पा तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. ती सर्वांची काळजी घेते. मात्र आता ही बातमी आल्यानंतर शिल्पाच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला असावा.
शिल्पा शेट्टीच्या आधी कार्तिक आर्यन, अक्षय कुमार, आमिर खान, भूमी पेडणेकर यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चित्रपट आणि मालिकांचं शूटींग थांबवण्यात आलं आहे. ज्यामुळे शूटिंगवरही मोठा परिणाम झाला आहे.
संबंधित बातम्या
Aaliyah Kashyap: डेटिंगपासून ते मद्यसेवनापर्यंत सर्व काही आई-बाबांना सांगते; आलियाचे बिनधास्त बोल