प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीकडून घोडचूक; नेटिझन्सनी झापलं

आज संपूर्ण भारतात देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकांनी नेहमीप्रमाणे सोशल मीडियावरही हा राष्ट्रीय सण साजरा केला.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीकडून घोडचूक; नेटिझन्सनी झापलं
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 7:13 PM

मुंबई : आज संपूर्ण भारतात देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकांनी नेहमीप्रमाणे सोशल मीडियावरही हा राष्ट्रीय सण साजरा केला. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सर्वत्र शुभेच्छांचा पाऊस पडत होता. अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रेटी आणि खेळाडूंनीही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेदेखील आज ट्विटरवरुन चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु या शुभेच्छा देताना शिल्पाकडून एक मोठी चूक झाल्यामुळे तिला नेटीझन्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. (Shilpa Shetty gets trolls as she wishes fans for Independence Day)

शिल्पाने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जे ट्विट केलं होतं, त्यामध्ये एक चूक केली होती, तिने चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे तिला नेटिझन्सच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिल्पाने ट्विट केलं होतं की, 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व भारतीयांना हॅप्पी रिपब्लिक डे, चला आपल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार व कर्तव्ये पार पाडण्याची प्रतिज्ञा करूया. केवळ स्वतःसाठीच नाही तर सर्व नागरिकांसाठी ही कर्तव्ये पार पाडूया. जय हिंद.

शिल्पाचं हे ट्विट पाहून नेटीझन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर अनेकांनी तिला तिची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर शिल्पाने तिचं ट्विट डिलीट केलं. त्यानंतर दुसरं एक ट्विट करुन तिने पुन्हा एकदा चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे ट्विट करताना तिने कोणतीही चूक केली नाही.

ताणतणावापासून दूर राहण्यासाठी शिल्पा शेट्टी घेते व्यायामाचा आधार

कोरोना लॉकडाऊनच्या काळात ताणतणाव कमी करण्यासाठी किंवा या काळात घरातून काम करताना आपण काही सोपे व्यायाम प्रकार करू शकता. या व्यायामांमुळे आपल्याला दिवसभराची ऊर्जा देखील मिळेल. बॉलिवूडची ‘फिट अँड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टी स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगासन करते. नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिने तिचा फिटनेस व्हिडीओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी योगासनानसह व्यायाम करताना दिसत आहे. नेहमी स्टायलिश दिसणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यावेळी राखाडी पँटसह गुलाबी रंगाचा स्पेगेटी टॉप परिधान केला होता. सोशल मीडियावर फिटनेस व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने लिहिले की, ‘स्वत:ला निसर्गाशी जोडणे हे माझे एकमेव ध्येय आहे. स्वत:ला तणावापासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छ हवेत श्वास घेणे आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. या व्हिडीओमध्ये ती स्क्वॉट करताना दिसत आहे.

इतर बातम्या

शेतकरी आंदोलनाचा विरोध करणं कंगनाला महागात, 6 ब्रॅंडने रद्द केली कॉन्ट्रॅक्ट!

रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

(Shilpa Shetty gets trolls as she wishes fans for Independence Day)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.