Shoaib Malik Wife Sana Javed New Photos : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचा माजी पती शोएब मलिक हा तिसऱ्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. सानिया मिर्झा आणि शोएबच्या नात्यात काही ठीक नाही, ते वेगळे होत आहेत, अशा अनेक बातम्या समोर येत असतानाच, अचानक शोएबने त्याच्या लग्नाचेच फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी त्याने तिसरं लग्न केलं आणि त्या दोघांनाही बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शोएब आणि सना या दोघांवरही नेटकरी खूप भटकले आहेत. सानिया मिर्झाला तू फसवलंस असा आरोपही अनेकांनी शोएबवर केला. नेटकऱ्यांचा राग अजूनही कमी झालेला नाही.
शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद हिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही नवे फोटो शेअर केलेत. तिचे लाखो चाहते आहेत, मात्र या फोटोंवर तिला लाईक्स आणि चांगल्या कमेंट्सपेक्षा ट्रोलिंगचाच सामना करावा लागत आहे. अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
काम असं करा की हिंदुस्थानी आणि पाकिस्तान्यांनी मिळून शिव्या घालाव्यात, भडकले नेटीजन्स
सना जावेदने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये, तिने दोन वेगेगळे, सुंदर लेहेंगे घातलेले दिसत आहेत. एका ब्रँड कोलॅबरेशनचे हे फोटो आहेत. तिने हे फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केले. मात्र तिच्या फॅशन चॉईसबद्दल कौतुक होण्यायाऐवजी ती ट्रोलर्सचे लक्ष्य बनली. या पोस्टवर नेटिझन्स सातत्याने कमेंट करत आहेत. तिचे आणि शोएबचे लग्न लवकर संपावे अशी अनेक यूजर्सची इच्छा होती. त्याचवेळी काही लोकांनी तिला शोएब मलिकशी लग्न केल्याबद्दल जोरदार फटकारले.
दरम्यान अलीकडेच पाकिस्तानी न्यूज चॅनल ‘सामा टीव्ही’वरील पॉडकास्टमध्ये दावा करण्यात आला होता की, सानिया मिर्झाशी लग्न झालेले असतानाचा, शोएब मलिक आणि सना यांचे गेल्या तीन वर्षांपासून अफेअर होते. पॉडकास्टमध्ये असे म्हटले होते की, जेव्हा सनाने मलिकशी लग्न केले, त्याच्या फक्त तीन महिने आधीच तिचा माजी पती उमेर जसवालपासून घटस्फोट झाला होता.
शोएबही झाला ट्रोल
लग्नानंतर काही दिवसांनी बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळताना टाकलेल्या एका ओव्हरमुळेही शोएब मलिकवर प्रचंड टीका झाली होती. शोएब मलिकने एका षटकात तीन नो-बॉल टाकले. त्यामुळेही नेटीझन्सही त्याला ट्रोल केले. ही युजर्सनी त्याच्या गोलंदाजीची तुलना मोहम्मद आमिरशी केली, तर काहींनी त्याला फिक्सर म्हटलं. काही युजर्नसी तर असंही लिहीलं की ‘ लग्न असो किंवा नो-बॉल, तो सर्वकाही तीनदा करतो’.