लाल साडी, हातात बांगड्या अन् सिंदुर; नवी नवरी शोभिताने कसा साजरा केला लग्नानंतरचा पहिला पोंगल? नेटकऱ्यांकडून कौतुक
अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या लग्नानंतरचा पहिला सण म्हणजे पोंगल अगदी खास पद्धतीने साजरा केला आहे. शोभिताने रांगोळीपासून ते पुजेच्या प्रसादापर्यंत सर्व अगदी पारंपारिक पद्धतीने केल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. या जोडीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये डिसेंबरमध्ये लग्न केलं. लग्नातील त्यांच्या पेहरावापासून ते त्यांच्या विधींपर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा झाली. शोभिताने लग्नानंतरही त्यांचे जे काही रिती-रिवाज आहे ते फॉलो करताना अनेकदा दिसली. आताही तिचे असेच काही फोटो व्हायरल होत आहेत. जे की तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या सणाचे आहेत. तो सण म्हणजे पोंगल.
शोभिताने लग्नानंतरचा पहिला पोंगल साजरा केला
महाराष्ट्रात जशी मकरसंक्रात असते तसाच साउथमध्ये पोंगल असतो. शोभिताचा हा लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. त्यामुळे तिने तो अगदी मनापासून तिच्या नवऱ्यासोबत साजरा केला आहे.
या जोडीनेनपहिला पोंगल नवविवाहित जोडपे म्हणून साजरा केला आहे. शोभिताच्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांनी साजरा केलेल्या सणाची पहिली झलकही दाखवली आहे.
14 जानेवारी रोजी शोभिताने साजरा केलेल्या सणाचे फोटो शेअर केले. तिने पारंपारिक बोनफायरच्या प्रतिमेसह सुरुवात केली. शोभिताने “भोगी, नूतनीकरण, परिवर्तन” या कॅप्शनसह हा फोटो शेअर केला . भोगी हा पोंगल उत्सवाचा अविभाज्य भाग आहे” असं कॅप्शनही दिलं आहे.
मिरर सेल्फी अन् प्रसादाची झलक
पुढे, तिने एक मिरर सेल्फीही शेअर केला. शोभिताने बेज ब्लाउजसोबत लाल साडी नेसली होती, हातात लाल बांगड्या अन् सिंदूरही लावला होता. शोभिता पुन्हा एकदा एखाद्या नव्या नवरीसारखी दिसत होती. दुसऱ्या एका फोटोमध्ये शोभिता आणि नागा चैतन्यचे पाय आणि समोर काढलेली रांगोळी दिसत आहे.
एवढंच नाही तर पोंगलच्या शुभ मुहूर्तावर दिल्या जाणाऱ्या प्रसादाची झलकही शोभिताने शेअर केली .तसेच नागा चैतन्यनेही शोभिता धुलिपालासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “माझ्या विशाखा राणीसोबत पांडुगा वाइब्स.”
फोटोमध्ये नवविवाहित जोडपे त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत. आणि या वेशभूषेत ही जोडी पुन्हा नवविवाहित दांपत्य असल्याची आठवण करून देत आहे. तसेच शोभिताने रांगोळीपासून ते पुजेच्या प्रसादापर्यंत सर्व अगदी पारंपारिक पद्धतीने केल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. या जोडीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.