Sushant Singh Rajput Case | शौविक चक्रवर्तीचे ड्रग्ज सिंडिकेटशी कनेक्शन, जामीन नाकारत कोर्टाचे ताशेरे!

शौविक ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा (Drugs Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

Sushant Singh Rajput Case | शौविक चक्रवर्तीचे ड्रग्ज सिंडिकेटशी कनेक्शन, जामीन नाकारत कोर्टाचे ताशेरे!
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 7:21 PM

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री  रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. तब्बल 28 दिवसांनंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली आहे. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा (Showik Chakraborty) जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. शौविक ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा (Drugs Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे (Showik Chakraborty is involve in the Drugs Syndicate says Mumbai HC).

शौविक चक्रवर्तीच्या जामीन अर्ज निकालावरील कोर्टाचे निरीक्षण

शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) हा अमलीपदार्थांचा बेकायदा पुरवठा करणाऱ्या टोळीचा आणि साखळीचा एक भाग आहे, हे दाखवणारे पुरेसे पुरावे या टप्प्यावर एनसीबीने सादर केले आहेत. हे पुरावे पाहता शौविकचा अनेक अमलीपदार्थ विक्रेत्यांशी (Drugs Syndicate) परिचय होता. तसेच तो सतत त्यांच्या संपर्कात होता. त्यांच्यासोबत व्यवहारही करत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे त्याला सध्या जामीन मंजूर करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

तपास पूर्ण झाल्यानंतर, शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) विशेष एनडीपीएस कोर्टात जामिनासाठी अर्ज करू शकतो, असेही हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे आबीद बसित परिहार याच्याबाबतही एनसीबीचा युक्तिवाद मान्य करून, त्याचा ही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची धडक कारवाई

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीसह सुमारे 21 जणांना अटक झाली होती. ज्यांना तपासाच्या सुरुवातीला अटक झाली होती आणि जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यापैकी पाच जणांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी 23 सप्टेंबर रोजी अर्ज केला होता. त्यावर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता, ज्यावर आज निर्णय देण्यात आला आहे. (Showik Chakraborty is involve in the Drugs Syndicate says Mumbai HC)

शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत आणि आबीद बसित परिहार या चार जणांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, यापैकी केवळ रिया, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत या तिघांनाच जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने अनेक अटीदेखील घातल्या आहेत. तर, शौविक चक्रवर्ती आणि आबीद बसित परिहार यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला गेला आहे.

रिया ड्रग्ज सिंडिकेटमध्ये नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा

रिया ड्रग्ज सिंडिकेटची (Drug Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने, रियाला जामीन देण्यात आला आहे. दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 27-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले.

(Showik Chakraborty is involve in the Drugs Syndicate says Mumbai HC)

संबंधित बातम्या : 

Rhea Chakraborty bail | तब्बल 28 दिवसानंतर रियाची सुटका, भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त!

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये नाही; कोर्टाकडून दिलासा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.