Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

13 वर्षानंतर लाडक्या लेकीशी पहिल्यांदाच भेट, डोळ्यात अश्रू तरळले; राजा चौधरी म्हणतो, जिंदगीने मुझे दुसरा…

अभिनेत्री श्वेता तिवारीचा पहिला पती राजा चौधरी याने त्याची मुलगी पलक तिवारी हिची अनेक वर्षांनी भेट घेतली.

13 वर्षानंतर लाडक्या लेकीशी पहिल्यांदाच भेट, डोळ्यात अश्रू तरळले; राजा चौधरी म्हणतो, जिंदगीने मुझे दुसरा...
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 11:19 AM

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीचे (shweta tiwari) टीव्ही इंडस्ट्रीत खूप नाव आहे. श्वेताने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेनंतर श्वेता घराघरात ओळखली जात होती. ती टीव्हीवरून गायब झाल्यानंतरही अनेक लोक तिची आठवण काढत असतात. मात्र श्वेता आता पुन्हा छोट्या पडद्यावर सक्रिय झाली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर श्वेताचे आयुष्य रोलरकोस्टर राई़डसारखे आहे. दोन लग्न झाली, ती दोन्ही अयशस्वी ठरली.

पहिल्या लग्नापासून पलक तिवारी (Palak Tiwari)  ही तिची मुलगी आहे. तर दुसरं लग्न झाल्यावर त्यांना रेयांश हा मुलगा झाला. सध्या श्वेता आपल्या मुलांसोबत सुट्टीवर गेली आहे. पलक चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालत आहे. तिने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

श्वेताचे पहिले लग्न राजा चौधरी सोबत झाले होते जेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती. काही काळ डेट केल्यानंतर 1998 मध्ये दोघांनी लग्न केले. पण 2007 मध्ये श्वेताने राजावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि ती त्याच्यापासून वेगळी झाली. मुलीचा पूर्ण ताबा श्वेताला मिळाला. सिंगल मदर असल्याने श्वेताने पलकचे खूप चांगले संगोपन केले.

राजा चौधरीही श्वेताने केलेल्या संगोपनामुळे खूप प्रभावित आहेत. जेव्हा श्वेता राजापासून वेगळी झाली, त्यानंतर 13 वर्षांनी पहिल्यांदा पलक तिवारी तिच्या वडिलांना भेटली. आता पलक प्रौढ झाली आहे, ती स्वत: ठरवू शकते की तिला वडिलांना भेटायचे आहे की नाही. अलीकडेच एका मुलाखतीत राजाने मुलगी पलकबद्दल सांगितले. तो म्हणाला की, मी पलकला 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भेटलो, तेव्हा ती लहान होती. पण आता ती मोठी झाली आहे.

राजा म्हणाला- पलक आणि मी व्हॉट्सॲप मेसेजद्वारे एकमेकांशी संपर्कात असतोआहोत. मी तिला रोज गुड मॉर्निंगचा मेसेज करतो. मी माझ्या आई-वडिलांसोबत मेरठमध्ये राहतो. काही कामानिमित्त मुंबईला गेल्यावर पलकला मेसेज केला. ती तिच्या चित्रपटासाठी रिहर्सल करत होती. थोडा वेळ काढून ती मला मुंबईच्या अंधेरी येथील हॉटेलमध्ये भेटायला आली. आम्ही जवळपास दीड तास भेटलो. आमच्यात एकमेकांबद्दल द्वेष नव्हता. आम्ही दोघे भूतकाळाबद्दलही काहीच बोललो नाही.

आम्ही फक्त एकमेकांशी गप्पा मारल्या, चांगला वेळ घालवला. मी तिला माझ्या कुटुंबाबद्दल सांगितले. तिचे आजी-आजोबा, काका-काकू यांच्याबद्दल सांगितलं. सगळ्यांबद्दल जाणून घेऊन तिला खूप आनंद झाला. तिने मला सांगितलं की ती लवकरच कुटुंबियांना भेटण्यासाठी मेरठला येणार आहे. आमच्या दोघांसाठी हा एक नवीन टप्पा आहे. मी अजूनही तिच्यासाठी काळजी घेणारा आणि प्रेमळ पिता आहे. आयुष्याने मला दुसरी संधी दिली आहे. आता मला माझं आणि मुलीचं नातं खराब करायचं नाहीये. मी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. तिच्यासाठी असलेलं माझं प्रेम कमी झालेल नाही. इतकी वर्ष मी तिला भेटू शकलो नाही, तो काळ माझ्यासाठी दु:खद होता.

पण आता माझी मुलगी मोठी झाली आहे, ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते. मला फक्त वाटतं की काश मी तिला तेव्हा भेटू शकलो असतो. मला त्या सर्व गोष्टी आठवतात ज्या मी एक वडील म्हणून तिच्यासोबत करू शकलो नाही. शाळेत जाताना तिच्या आवडी-निवडी ओळखू शकलो नाही. पण जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा मला समजले की तिचं पालनपोषण खूप चांगलं झाले आहे. मला माझी माजी पत्नी श्वेताचे आभार मानायचे आहेत. आज मी खूप आनंदी आहे.”

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.