मनोरंजन विश्वातील प्रसिध्द जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.
या दोघांसाठी सिनेविश्वातील त्यांच्या सहकलाकार, मित्र-मंडळींकडून खास केळवणाचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यांच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतील ‘मम्मी’ म्हणजेच स्मिता तांबेने आपल्या ऑनस्क्रीन सुनेला म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिध्दार्थ चांदेकर यांना घरी खास केळवणासाठी निमंत्रित केले होते.
स्मिताचे पती आणि तिच्या संपूर्ण कुटुंबियांनी सिद्धार्थ-मितालीचे शानदार स्वागत केले. 'खरंच लाडाची लेक असल्यासारखं वाटलं', असे म्हणत मितालीने हे फोटो शेअर केले आहेत.