Video | सिद्धार्थ-मितालीचा लग्नानंतरचा पहिलाच ‘व्हॅलेंटाईन डे’ बनला खास, पाहा दोघांची रोमँटिक केमिस्ट्री!
सिद्धार्थ आणि मिताली 2020मध्येच लग्न बेडीत अडकणार होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले होते. अखेर नववर्षाचा मुहूर्त साधत त्यांनी एकमेकांना साताजन्माची वचने दिली आहेत.
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जोडी अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar). नववर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी महिन्यात सिद्धार्थ आणि मितालीचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. आता जवळपास त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण होत आहे. त्याच निमित्ताने मिताली-सिद्धार्थने त्यांचे काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Siddharth Chandekar and Mitali Mayekar shares adorable photos on social media).
काहीच दिवसापूर्वी मितालीने लग्नानंतरचा पहिलाच ‘व्हॅलेंटाईन डे’ किती खास होता हे एका व्हिडीओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केले होते. या व्हिडीओत मिताली छान मरून रंगाच्या साडीत तयार झाली होती. इतकंच नाही तर, सिद्धार्थसाठी त्याच्या आवडीचा स्वयंपाक देखील तिने बनवला होता. सिद्धार्थलाही तिचं हे ‘व्हॅलेंटाईन डे’ सरप्राईज फारच आवडलं होतं.
View this post on Instagram
ढेपेवाड्यात रंगला विवाह सोहळा!
पुण्यातील ढेपे वाड्यात सिद्धार्थ आणि मिताली विवाहबद्ध झाले. या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पतीसोबत या विवाहसोहळ्यात सहभागी झाली होती. तर पूजा सावंत, भूषण प्रधान हे देखील सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला आले होते. मिताली व सिद्धार्थने लग्नात केलेली मस्ती, एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर एकमेकांना मारलेली घट्ट मिठी ते लेकीच्या लग्नात भावूक झालेली आई, तिच्या डोळ्यातील अश्रू, असे सगळे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते (Siddharth Chandekar and Mitali Mayekar shares adorable photos on social media).
View this post on Instagram
(Siddharth Chandekar and Mitali Mayekar shares adorable photos on social media)
दोघांची रोमँटिक केमिस्ट्री!
लग्नानंतर हे क्युट कपल लोणावळ्याच्या ‘द मचान’ या रिसोर्टमध्ये मधुचंद्रासाठी रवाना झाले होते. त्या दोघांनी या खास क्षणांचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत दोघांची रोमँटिक केमिस्ट्री दिसून येत आहे. एका फोटोत तर मिताली मयेकर आपल्याला बाथटबमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत सिद्धार्थ आणि मिताली किस करताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूपच भावतो आहे.
असे जुळले प्रेमबंध!
एका मुलाखतीत मितालीने सिद्धार्थ सोबतच्या नात्याविषयी सांगितले होते. या दोघांची भेट एक कार्यक्रमादरम्यान झाली होती. दोघांचाही कॉमन फ्रेंड असणाऱ्या शिवराज वायचळ याने सिद्धार्थ-मितालीची एकमेकांशी ओळख करून दिली होती. यानंतर दोघांची एकमेकाशी छान मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
सिद्धार्थ आणि मिताली 2020मध्येच लग्न बेडीत अडकणार होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले होते. अखेर नववर्षाचा मुहूर्त साधत त्यांनी एकमेकांना साताजन्माची वचने दिली आहेत.
(Siddharth Chandekar and Mitali Mayekar shares adorable photos on social media)