Sidharth Malhotra Kiara : अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या लग्नाला ३ महिने झाले आहेत. लग्नानंतर हे स्टार्स सतत शूटिंगमध्ये व्यस्त असतात. पण अलीकडेच, सिद्धार्थ मल्होत्राला शूटिंगमधून थोडा वेळ मिळताच, तो पतीची जबाबदारी पार पाडताना दिसला. नवरा असण्याचे कर्तव्य बजावताना अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सिद्धार्थने निभावला पती धर्म
खांद्यावर अनेक बॅग्स लटकवलेला सिद्धार्थ मल्होत्राचा फोटोने व्हायरल झाला असून त्याची बरीच चर्चा सुरू आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ रस्त्याच्या कडेला अनेक बॅग खांद्यावर घेऊन उभा असलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थ मल्होत्राने लिहिले- मी पतीचे कर्तव्य पार पाडत आहे. यासोबतच त्याने कियाराला टॅग करत हार्ट इमोजीही शेअर केले आहे.
कियाराने दिली ट्रीट
त्यासोबतच सिद्धार्थ मल्होत्राने आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा काहीतरी खाताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘लवकर काहीतरी खाऊया, पुन्हा बॅग उचलायला जायचं आहे. या ट्रीटबद्दल थँक्यू कियारा.
पोस्ट होत्ये व्हायरल
सिद्धार्थ मल्होत्राची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट निळ्या रंगाच्या ट्राऊजरसह घातला आहे. सिद्धार्थ मल्होत्राने हा फोटो शेअर करताच काही वेळातच तो व्हायरल झाला.
कामाबद्दल बोलायचे झाले तर लग्नानंतर कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा पहिला चित्रपट 29 जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची गाणी आणि टीझर रिलीज झाला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा हा सध्या ’योद्धा’मुळे चर्चेत आहे.