पंजाब : पंजाबी गायक (Punjabi Singer) सिद्धू मूसवालांची (Sidhu Moose Wala Murder)हत्या ही सर्वात धक्कादायक बातमी आहे. मे 29 हा काळा दिवस ठरला जेव्हा पंजाबी संगीत विश्वाने एक जबरदस्त सिंगर गमावला. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी सिद्धू यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Sidhu Moose Wala Funeral) करण्यात आले. हा क्षण त्याच्या चाहत्यांसाठी वेदनादायक होता. चाहते आणि कुटुंबातील सदस्यांनी पानावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. त्यांच्या कुटुंबियांचं हे दु:ख कधीच भरून निघणार नाही. सिद्धू मुसेवालांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तुम्ही त्यांचा आवडता 5911 ट्रॅक्टर अनेकदा पाहिला असेल. या ट्रॅक्टरमध्ये मुसेवाला यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली.
ट्रॅक्टरच्या समोर त्यांचे बॅनर लावण्यात आले होते, मुसेवाला यांना बंदुकांची विशेष आवड होती हे सर्वांनाच माहीत आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या अंत्यसंस्कारावेळी अंतिम दर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुरूवातील त्यांचे अंत्यसंस्कार दुसरीकडे होणार होते मात्र ऐनवेळी अंत्यसंस्काराचे ठिकाणही बदलण्यात आले. सिद्धू मुसेवालाचे आई-वडील रडतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. सिद्धूचा शेवटचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अफसाना खानचा गायक सिद्धू मुसेवालांसोबतचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिद्धू मुसेवाला यावर्षी अफसाना खानच्या लग्नात पोहोचले होते. अफसाना खानच्या लग्नात पोहोचल्यानंतर सिद्धू मुसेवालांनी धमाल केली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर अफसानने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सिंगरवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी घेतली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून तयार करण्यात आला होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती. लॉरेन्स बिश्नोई याने तुरुंगात बसून कॅनडामध्ये असलेला त्याचा मित्र गोल्डी ब्रार याच्यासोबत हत्येचा प्लॅन बनवला. लॉरेन्स आणि गोल्डीच्या टोळीने 30 राऊंड फायर केले. सिद्धू मुसेवाला यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा श्वास थांबला होता.