माझ्या स्कर्टमध्ये हात… हृतिक रोशनचे काका, संगीतकार राजेश रोशन यांच्यावर गायिकेचा मोठा आरोप, काय आहे प्रकरण ?

अभिनेता हृतिक रोशनचे काका आणि विख्यात संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांच्यावर बंगाली गायिका लग्नजीता चक्रवर्तीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यांच्या घरी गेल्यावर काय-काय घडलं हे तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. तिच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ माजली आहे. काय आहे लग्नजीता चक्रवर्तीचा आरोप ?

माझ्या स्कर्टमध्ये हात... हृतिक रोशनचे काका, संगीतकार राजेश रोशन यांच्यावर गायिकेचा मोठा आरोप, काय आहे प्रकरण ?
राजेश रोशन यांच्यावर गायिकेचा आरोप
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 11:52 AM

बंगाली गायिका लग्नजीता चक्रवर्तीने एक खळबळजनक विधान केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.तिने बॉलीवूडमधील विख्यात संगीतकार आणि अभिनेता हृतिक रोशन याचे काका राजेश रोशन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे. मात्र तिच्या या आरोपांवर राजेश रोशन यांनी आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.10 डिसेंबर 2024 चा एक व्हिडीओ समोर आला असून एका मुलाखतीमध्ये लग्नजीता चक्रवर्ती हिने तिचे अनुभव सांगतानाच हे आरोप केले आहेत. त्यामुळे आता मोठी खळबळ माजली आहे.

त्या मुलाखतीतील लग्नजीता हिच्या दाव्यानुसार, काही वर्षांपूर्वी मुंबईत ही घटना घडली होती. कामाच्या संदर्भात ती राजेश रोशन यांना भेटण्यासाठी गेली होती, तेव्हाच तिथे हा प्रकार घडल्याचा दावा तिने केला आहे.

काय म्हणाली लग्नजीता ?

या इंटरव्ह्यूमध्ये लग्नजीताने सांगितलं की राजेश रोशन यांनी तिला त्यांच्या सांताक्रूझ येथील घरी येण्याचे निमंत्रण दिले होते, कामासंदर्भात ही भेट होती. ‘ मी जेव्हा मुंबईत रहायचे तेव्हा त्यांनी मला सांताक्रूझला भेटायला बोलावलं. मी त्यांचा घरी गेले, तेथे बसले. तेही थोड्या अंतरावर माझ्या बाजूलाच बसले होते. त्या खोलीत सर्वत्र पियानो आणि संगीताची इतर उपकरणं ठेवली होती’, असं लग्नजीताने सांगितलं.

ते जवळ येत होते

लग्नीजाताच्या सांगण्यानुसार, राजेश रोश यांनी तिला माहिती विचारत तिच्या कामाचे काही नमून दाखवण्यास सांगितलं. तिच्या हातात आयपॅड दिला आणि यूट्यूबवर तिची गाणी शोधण्यास सांगितलं. ‘ माझ्या हातात आयपॅड होता, मी टाईप करत माझी गाणी शोधत होते. तेवढ्यात मला जाणवलं की ते ( राजेश रोशन) माझ्याजवळ येत होते .’

माझ्या स्कर्टमध्ये हात घातला

लग्नजीता म्हणाली ‘ मी पहिल्यांदाच स्कर्ट घातला होता. मी आयपॅडवर टायपिंग करत होते, तेव्हा मला जाणवलं की ते हळू-हळू माझ्याजवळ येत होते. मी विचार केला, बघूया तर ते काय करतात, किती पुढे येतात ते पाहू. पण थोडाही वेळ न लावता ते पुढे आले, कॅमेऱ्यावर सांगतनाही विचित्र वाटतं पण त्यांचा हात माझ्या स्कर्टच्या आतमध्ये होता. मी लगेच तिथून उठले आणि निघून जाण्याचा निर्णय घेतला ‘ असं तिने स्पष्ट केलं.

माझ्यावर परिणाम झाला नाही

कास्टिंग काऊच हे काही फक्त बॉलिवूडपुरतंच मर्यादित नाहीये, संगीत क्षेत्रातही ते असतंच असं लग्नजीता म्हणाली. ‘मी या गोष्टीचा स्वत:वर जास्त परिणाम होऊ दिला नाही की त्या गोष्टीचा खूप गवगवाही केला नाही.कारण मला वाटत ही त्यांची चूक होती, ते असं वागले हे त्यांचं चुकीचं वागणं होतं. त्याचं दायित्व त्यांच आहे, माझं नाही ‘ असं तिने नमूद केलं. लग्नजीता चक्रवर्ती एक प्रसिद्ध बंगाली गायिका आहे. तिने अनेक जाहिरातीसांठी, जिंगल्ससाठी आवाज दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?.
उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या...
उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या....
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?.
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य.