Neha Kakkar Cried At Melbourne Concert : गायिक नेहा कक्कर ही नेहमी चर्चेत असते. सध्या तिचाय एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. हा व्हिडीओ तिच्या मेलबर्नमधील कॉन्सर्टचा आहे, तिथे लाईव्ह शो मध्ये परफॉर्म करतानाच नेहाला भर स्टेजवरच रडू कोसळलं. स्टेजवर रडणारी नेहा आणि हूटिंग करणारे प्रेश्रक हा व्हिडीओ सध्या चर्चेता विषय ठरले आहेत. असं नेमकं झालं तरी काय ?
खरंतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये नेहा कक्करचा एका कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता, मात्र ती स्वत:च्या शोसाठी अर्धा-एक तास नव्हे तर तब्बल 3 तास उशीरा पोहोचली. यामुळे तिची वाट पाहून वैतागलेले प्रेक्षक प्रचंड भडकले होते आणि नेहा स्टेजवर आल्यावर मात्र प्रेक्षकांचे पेशन्स संपले आणि त्यांचा भटका उडाला. तिचा परफॉर्मन्स पाहण्यात कोणालाच रस नव्हता, सगळ्यांनी तिला थेट परत जाण्यास सांगितलं.
नेहा कक्कर तीन तास उशिरा आल्यामुळे प्रेक्षकांमधील काही लोकांनी तिला पाहून हूटिंगही केलं. तर इतर लोकही तिच्यावर चांगलेच नाराज झाले. नेहाने तिच्या चुकीबद्दल चाहत्यांची माफीही मागितली मात्र तरीही लोकांचा विरोध काही थांबला नाही आणि लोकांच्या निषेधानंतर ती स्टेजवरच रडू लागली.
मी आयुष्यात कोणालाही वाट पहायला लावली नाही
प्रेक्षकांची नाराजी पाहून नेहा कक्करने सर्वांची माफी मागितली. ती म्हणाली – ‘मित्रांनो, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही आत्तापर्यंत धीर धरला आहात. तुम्ही खूप वेळापासून वाट पाहत आहात. मला खरतंर या गोष्टीचा राग आहे, मी संपूर्ण आयुष्यात कधीही कोणालाही वाट पहायला लावली नाहीये. तुम्हाला इतक्या वेळेपासून वाट पहायला लागत आहे, मला खरंच त्याचा खेद वाटतो. हे माझ्यासाठीखूप महत्वाचं आहे, मी ही संध्याकाळ नेहमीच लक्षात ठेवेन.
Neha Kakkar crying for being 3 hrs late at a Melbourne show
She also performed for less than 1 hour #NehaKakkar pic.twitter.com/TGyhaeCjpu— Redditbollywood (@redditbollywood) March 24, 2025
हे काही इंडियन आयडॉल नाहीये…
पण नेहाने एवढी माफी मागूनही प्रेक्षकांचा राग काही कमी झाला नाही. तीन तास वाट बघून ते चांगलेच वैतागले होते. नेहाच्या माफीनंतरही लोकांना तिचं काहीच ऐकायचं नव्हतं, त्यांना परफॉर्मन्सही पहायचा नव्हता. याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक प्रेक्षक तिला उद्देशून म्हणाल – ‘तू परत जा, हॉटेलवर जाऊन आराम कर’ तर दुसरा प्रेक्षक म्हणाल ‘हा काही भारत नाही, हे ऑस्ट्रेलिया आहे.’. व्हिडीओत आणखी आवाज आला, ‘ आम्ही तीन तासांपासून वाट पाहतोय’ ‘ चांगली ॲक्टिंग करते (ही), पण हे इंडियन आयडॉल नाही. तू काही लहान मुलांसमोर परफॉर्म करत नाहीयेस ‘ अशी टीका करत लोकांनी तिला परत जायला सांगितलं. त्यामुळे नेहाला स्टेजवरच रडायला आलं.