Birthday Special | ‘सारेगमप’पासून सुरुवात, आता करतेय संगीत विश्वावर राज्य, वाचा गायिका श्रेया घोषालबद्दल…
श्रेयाला लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याने संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. श्रेयाने एकदा नव्हे तर दोनदा 'सारेगमपा' या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता.
मुंबई : ‘देवदास’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करून, लाखोंची मने जिंकणारी श्रेया घोषाल आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रेयाचा जन्म 12 मार्च रोजी बहरामपुरात झाला होता. श्रेयाने अगदी लहान वयातच गाणे शिकण्यास सुरूवात केली होती. तिच्या संगीत कारकीर्दीत तिने आतापर्यंत 200हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तिची बरीचशी गाणी सुपरहिट ठरली आहेत. आज श्रेयाच्या वाढदिवशी तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया…(Singer Shreya Ghoshal Birthday Special know about her)
श्रेयाला लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याने संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. श्रेयाने एकदा नव्हे तर दोनदा ‘सारेगमपा’ या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमातून तिला तिच्या कारकिर्दीतील पहिले गाणे गाण्याची संधी मिळाली होती. श्रेया पहिल्यांदा शोमध्ये सहभागी झाली, तेव्हा सोनू निगम शो होस्ट करत होता आणि तर जजच्या खुर्चीत कल्याणजी होते. संगीतकार कल्याणजींच्या सांगण्यावरून श्रेयाच्या आई-वडिलांनी तिला मुंबईत आणले. जिथे त्यांनी 18 महिने संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुन्हा ‘सारेगमप’मध्ये भाग घेतला.
संजय लीला भन्साळी यांनी दिली पहिली संधी
श्रेया घोषालने दुसऱ्यांदा सारेगामापामध्ये भाग घेतला, तेव्हा तिच्या गाण्याची दखल संजय लीला भन्साळी यांनी घेतली. संजय लीला भन्साळी यांची आईसुद्धा हा कार्यक्रम बघायची. आईच्या सांगण्यावरून संजय लीला भन्साळी यांनी श्रेयाला गाण्यासाठी बोलावले. तिला ‘देवदास’चे ‘बैरी पिया’ गाण्याची संधी दिली. या चित्रपटात श्रेया घोषालने इस्माईल दरबार यांच्या दिग्दर्शनाखाली पाच गाणी गायली (Singer Shreya Ghoshal Birthday Special know about her).
अमेरिकेत साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल दिन’
गायिका श्रेया घोषालने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड विजेत्या श्रेयाच्या नावे 26 जून रोजी अमेरिकेच्या ओहियोमध्ये ‘श्रेया घोषाल दिवस’ साजरा केला जातो. 2010मध्ये श्रेयाने ओहियोमध्ये एक कार्यक्रम केला होता, ज्याला त्या प्रांताच्या प्रमुख आणि अनेक नागरिक उपस्थित होते. तिच्या आवाजाची जादू इतकी होती, की तिथले लोक प्रभावित झाले आणि त्या वर्षीपासून ‘श्रेया घोषाल दिन’ साजरा केला जातो.
लता मंगेशकर प्रेरणा
श्रेया घोषाल लता मंगेशकर यांना आपली प्रेरणा मानतात. हिंदी व्यतिरिक्त श्रेयाने तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी आणि बंगाली भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत.
लवकरच होणार आई!
View this post on Instagram
श्रेया घोषालने 2015मध्ये बंगाली रूढीनुसार शिलादित्यसोबत लग्न केले होते. दोघे 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. तिच्या लग्नात ती खूपच सुंदर होती. तिने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. आता श्रेया लवकरच आई बनणार आहे. बेबी बंप फ्लाँट करत तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता.
(Singer Shreya Ghoshal Birthday Special know about her)
हेही वाचा :
Swapnil Joshi | ‘एलिझाबेथच्या जाळ्या मधून कोणीही सुटू शकत नाही!’, पाहा स्वप्निल जोशीचा हॉरर लूक…
Video | ‘आजचा दिवस नवा’ म्हणत ‘Bigg Boss 14’ची ‘ही’ स्पर्धक करतेय पूलमध्ये धमाल! पाहा तिचा व्हिडीओ…