Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreya Ghoshal | गोड गळ्याची गायिका श्रेया घोषालकडे ‘गुडन्यूज’, सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल लवकरच आई बनणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Shreya Ghoshal | गोड गळ्याची गायिका श्रेया घोषालकडे ‘गुडन्यूज’, सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
श्रेया घोषाल
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 11:17 AM

मुंबई : गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल लवकरच आई बनणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कोरोना काळात सध्या मनोरंजन विश्वातून अशाच खूप चांगल्या बातम्या आली होती. अनुष्का शर्मा, करीना कपूर, कपिल शर्मा आणि बर्‍याच टीव्ही सेलिब्रिटीनंतर श्रेया देखील आपल्या घरी आता ‘चिमुकल्या’ पाहुण्याचे स्वागत करणार आहे (Singer Shreya Ghoshal shares pregnancy good news on social).

ट्विट करत चाहत्यांकडून मागितले आशीर्वाद

श्रेयाने ट्वीट करून लिहिले की, ‘बेबी श्रेयादित्य येत आहे. ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना मला आणि शीलादित्यला खूप आनंद होत आहे. तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाल्यामुळे आपणा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादांची आम्हाला गरज आहे.’ श्रेयाने 2015मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले होते.

वाईट काळातही आनंदची उधळण

लॉकडाऊन दरम्यान श्रेयाचे ‘आंगना मोरे’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. श्रेयाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, जेव्हा लॉकडाऊन दरम्यान ती खूप कंटाळली होती, तेव्हा तिला या गाण्याची कल्पना सुचली. ती म्हणते की, हा वाईट काळ सगळ्यांसाठीच निराशाजनक होता. सगळेच जण यातून बाहेर पडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते. मात्र, या वाईट काळातही आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव झाला, असे श्रेया म्हणाली.

श्रेयाची पोस्ट

कुटुंबासमवेत घालवला चांगला काळ

या मुलाकाहती दरम्यान श्रेयाने सांगितले होते की, 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे तिला कुटुंबासमवेत आणि गाण्याच्या रियाझसाठी खूप वेळ मिळाला होता. या काळात तिने साधेपणाने आयुष्य जगण्याची कला शिकली. याच काळात तिला हे देखील समजले की, बागकाम, साफसफाई आणि स्वयंपाक यासारख्या अगदी साध्या गोष्टींमध्येही आपल्याला खूप आनंद मिळतो (Singer Shreya Ghoshal shares pregnancy good news on social).

पाच वर्षानंतर शेअर केले लग्नाचे फोटो!

श्रेयाने 2015 मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली. श्रेयाने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित लग्न केलं होतं. विशेष म्हणजे तिने त्यावेळी लग्नातला केवळ एकच फोट शेअर केला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बंगाली रितीरिवाजानुसार श्रेया-शिलादित्यचं लग्न झालं होतं.

श्रेयाची कारकीर्द

छोट्या पडद्यावरील ‘सा रे ग म प’ ही स्पर्धा जिंकल्यानंतर श्रेयाने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने ‘देवदास’ या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. श्रेया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. बऱ्याच वेळा श्रेया पती शिलादित्यसोबतचे फोटो शेअर करत असते.

(Singer Shreya Ghoshal shares pregnancy good news on social)

हेही वाचा :

Yeu Kashi Tashi mi Nandayla | मालिकांच्या विश्वात नेमकं चाललंय तरी का?, ‘येऊ कशी तशी..’च्या ‘त्या’ दृश्यावर प्रेक्षक संतापले!

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.