निगेटिव्ह रिव्ह्यूज,तरीही ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोटींचा गल्ला; पहिल्याच दिवशी ‘सिंघम अगेन’ची छप्पर फाड कमाई,’भुल भुलैया 3’ ला टाकलं मागे
पहिल्याच दिवशी 'सिंघम अगेन'ची छप्पर फाड कमाई केली आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच कोटींचा गल्ला जमवला. सिंघम अगेनने "भूल भुलैया 3" लाही मागे टाकलं आहे.
अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिंघम अगेन’ शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा सिनेमा रीलिज करण्यात आला होता. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बऱ्याच जणांना असे वाटले होते की ही चित्रपट या आधीच्या सिंघम प्रमाणे चालणार नाही. तसेच समीक्षकांकडूनही या चित्रपटाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता काय होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सगळ्यांचाच अंदाज चुकला.
चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका
‘सिंघम अगेन’ कडून प्रेक्षकांना समिश्र अपेक्षा होती. म्हणजे ट्रेलरवरून तरी हा चित्रपट चालेल की नाही असं प्रश्नचिन्हच होतं. बॉक्स ऑफिसवर चित्रपट धमाल करेल की नाही यात नक्कीच संभ्रम होता. सर्वांचा अंदाज फोल ठरवत हा चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपटाची अनेक वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाला रिलीज झाल्यानंतर समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, पण असं असतानाही चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. सिंघम अगेनने पहिल्याच दिवशीच्या कमाईत कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ ला मागे टाकलं आहे.
नकारात्म प्रतिक्रियानंतरही ‘सिंघम अगेन’ची छप्पर फाड कमाई
सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, 5,12,545 तिकिटे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विकली, ज्यामुळे 15.7 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. चित्रपटाने ॲडवान्स बुकिंगमध्ये एकूण 18.69 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 27.06 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
‘भुल भुलैया 3’ ला टाकलं मागे
सिंघम अगेनचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कार्तिक आर्यनच्या ‘भूल’ 3 चित्रपटाच्या तुलनेत अधिक आहे. 1 नोव्हेंबर रोजीसंध्याकाळी 6 वाजेपर्यंत या चित्रपटाने 21.29 कोटींची कमाई केल्याचे म्हटले जाते. हे अद्याप निश्चित आकडे नाहीत. हे प्राथमिक आकडे असून त्यामध्ये बदल होऊ शकतात. पण पहिल्याच दिवशी सिंघम अगेन ने ‘भुल भुलैया 3’ ला मागे टाकलं आहे. दरम्यान सिंघम अगेन 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.