ते स्वत:हून माझ्याशी संपर्क…; आत्म्यांशी बोलते ही मराठमोळी अभिनेत्री, सांगितला अनुभव

मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये एक वेगळा अनुभव सांगितला आहे. हा अनुभव ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल...

ते स्वत:हून माझ्याशी संपर्क...; आत्म्यांशी बोलते ही मराठमोळी अभिनेत्री, सांगितला अनुभव
Smita Jaykar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 05, 2025 | 12:56 PM

मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्मिता जयकर ओळखली जाते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अजय देवगणच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांचा हा चित्रपट विशेष गाजला होता. आता स्मिता या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत.

स्मिता या सध्या इंडस्ट्रीपासून लांब असल्या तरी अनेक गोष्टी करताना दिसत आहेत. त्या आत्म्यांसोबत बोलतात, त्यानंतर ऑटोमॅटिक रायटिंग करतात. स्मिता यांचा खास करुन अध्यात्म आणि साधनावर यावर जोर आहे. त्यासंबंधीत त्या अनेक गोष्टी करताना दिसतात. त्यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे.

वाचा: सर्वांसमोर अमरीश पुरींनी स्मिता पाटीलच्या लगावली होती कानशिलात, नंतर अभिनेत्रीने जे काही केलं…

‘मला हा देवाने दिलेला आशिर्वाद आहे’

‘ऑटो रायटिंग म्हणजे काय तर हीलिंग प्रोसेस आहे. जे लोकं शरीर सोडून गेले आहेत त्यांच्या आत्म्याशी संपर्क साधणे, माझ्या समोर जो माणूस बसलाय ज्याचे आई, वडील, मुलगा किंवा इतरकोणी गेले आहेत ते माझ्याकडे येताता. मला सांगतात की मला त्या माणसाशी संवाद साधायचा आहे. मी एक माध्यम आहे. मला हा देवाने दिलेला आशिर्वाद आहे. मी कित्येक वर्ष ऑटो रायटिंग करत आहे. ते जग आपल्याला माहिती नाही. त्या जगाशी संपर्क साधणे आणि त्या आत्म्यांशी बोलणे हे माझे काम आहे’ असे स्मिता जयकर म्हणाल्या.

ते मला संकेत देतात

पुढे त्या म्हणाल्या,’मी समोरच्या व्यक्तीला ओळखत पण नाही. त्यांच्याबद्दल मला काही माहित देखील नसतं. तरीही तो आत्मा माझ्याशी बोलतो. तो मला संकेत देत असतो. कधीकधी घरात मला परफ्युमचा वास येतो. मी त्यांना विचारते परफ्युम आवडायचा का? तर त्यावर ते भयंकर आवडयाचा असे म्हणतात. कधी कधी आत्माहत्या असते, कधी अपघाती निधन असते. आपण त्या माणसाशी इतके जोडले गेलेले असतो की तो गेल्यावरही आपण त्याला जाऊ देत नाही. मग तो त्यांना मोकळं करण्याचा मार्ग असतो.’