एकेकाळी कुत्र्याशी तुलना, आज ही अभिनेत्री आहे ३०१० कोटींच्या साम्राज्याची सून; अभिनेत्याशी केले दुसऱ्यांदा लग्न
एका अभिनेत्रीला करिअरच्या सुरुवातीला लूकवरून प्रचंड ट्रोल केले जात होते. तिची तुलना कुत्र्याशी केली होती. आज हिच अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची मालकिण आहे.

ग्लॅमरच्या दुनियेत ठसा उमटवणे सोपे नसते आणि काही लोकांसाठी हा प्रवास खूपच आव्हानात्मक असतो. असाच काहीसा प्रकार आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत घडला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की एकदा ऑडिशनमध्ये तिचा इतका अपमान झाला होता की तिच्या जागी कुत्र्याला टाकण्यात आले होते. आज ही अभिनेत्री सुपरस्टार घराण्याची सून आहे. तसेच तिच्या पतीकडे एकूण ३०१० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.
आज शोभिता एक यशस्वी अभिनेत्रीच नाही तर साऊथचा सुपरस्टार अभिनेता नागा चैतन्यची पत्नी देखील आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला अनेक नकार आणि संघर्षांचा सामना करावा लागला होता. एका साध्या मुलीपासून मिस इंडिया विजेती, बॉलिवूड-हॉलिवूड स्टार आणि आता 154 कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या सुपरस्टारची पत्नी असा तिचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया…
Video: घटस्फोटीत अभिनेता पडला प्रेमात, गर्लफ्रेंडला नको तिकडे रंगलावताना पाहून संतापले नेटकरी




मॉडेल म्हणून केली करिअरला सुरुवात
शोभिताने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे. सुरुवातीला तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. कॉलेजमध्ये असताना तिच्या एका मैत्रिणीने तिला सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रेरित केले होते. मात्र, ती स्वत:ला साधी आणि ‘अनकूल’ समजत होती. पहिल्या भागात निवड व्हावी या उद्देशानेच तिने ऑडिशन दिले होते.
मुंबईत घेतले शिक्षण
डीएनए रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ती मॉडेलिंगसाठी ऑडिशनला गेली होती तेव्हा तिच्या रंग आणि लूकमुळे तिला नकार देण्यात आला होता. एका जाहिरातीत तिच्या जागी कुत्रा वापरण्यात आला होता. हा प्रसंग तिच्यासाठी मोठा धक्कादायक होता. पण तिने हार मानली नाही. ती मेहनत करत राहिली. ती पुढे जात राहिली. शोभिता ही विशाखापट्टणमची रहिवासी आहे. तिचे वडील वेणुगोपाल राव मर्चंट नेव्हीमध्ये होते आणि तिची आई संथा कामाक्षी प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. तिने शालेय शिक्षण विशाखापट्टणम येथे पूर्ण केले आणि नंतर कॉर्पोरेट कायद्याचा अभ्यास सुरू केला. याशिवाय, तिने मुंबई विद्यापीठातून एचआर बिझनेस आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवी मिळवली.
आयुष्यातील टर्निंग पॉइंट
शोभिताच्या कारकिर्दीतला मोठा टर्निंग पॉइंट जेव्हा आला जेव्हा तिने मेड इन हेवन वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर ती मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन आणि हॉलिवूड चित्रपट द मंकी मॅनमध्येही दिसली. शोभिता एका सिनेमासाठी ७० लाख ते १ कोटी रुपये घेते. तिच्याकडे एकूण १५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. शोभिता नागार्जुनची सून आहे. त्याच्याकडे एकूण ३०१० कोटी रुपयांची संपत्ती आहे.