जहीर इक्बालसोबत सोनाक्षी अडकणार लग्नबंधनात, पूर्वी ‘या’ अभिनेत्याला केलं डेट
दबंग स्टार सोनाक्षी सिन्हा लवकरच बॉलिवूडमधील अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र जहीरसोबतच्या नात्यापूर्वी या आधीही सोनाक्षीचे नाव आणखी काही लोकांशी जोडले गेले होते. एकेकाळी सोनाक्षी ही अभिनेता सोहेल खानच्या मेव्हण्यासोबतही रिलेशनशिपमध्ये होती, अशी चर्चा होती.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बरीच चर्चेत आहे. हिरामंडीमधील तिच्या कामाचे बरेच कौतुक तर झाले, पण सध्या ती खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. त्याच कारण म्हणजे तिच्या लग्नाच्या चर्चा. दबंग स्टार सोनाक्षी ही येत्या काही दिवसांतच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाक्षी ही अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत. त्यासंदर्भातील तयारीही जोरात सुरू आहे. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बऱ्याच काळापासून कानावर येत होत्या पण जहीर किंवा सोनाक्षी, दोघांपैकू कोणीच या नात्याची कबुलीदिल नाही. आणि आता लग्नाच्या बातम्यांबाबतही त्यांनी मौन राखणंच पसंत केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, येत्या 23 जून रोजी सोनाक्षी -जहीरचं लग्न होणार असून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना निमंत्रणही देण्यात आलं आहे.
दरम्यान जहीरपूर्वी सोनाक्षीचं नाव काही लोकांशी जोडलं गेलं होतं. त्यामध्ये एका अभिनेत्याचाही समावेश होता. मात्र सोनाक्षीने त्यावर कधीच काही प्रतिक्रिया दिली नव्हती.
अर्जुन कपूर – सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर या दोघांनी अमित शर्माने दिग्दर्शित केलेल्या ‘तेवर’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. 2015 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रिपोर्ट्नुसार, त्याचवेळी सोनाक्षी आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. मात्र अधिकृतरित्या त्यांच्या नात्यावर कधीच शिक्कामोर्तब झालं नाही.
बंटी सजदेह – सोनाक्षीचं नाव अभिनेता सोहेल खानच्या मेव्हण्याशी, बंटी सजदेह याच्याशी देखील जोडलं गेलं होतं. एकेकाळी ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एकमेकांना बरीच वर्ष डेट केलं. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
आदित्य श्रॉफ – सोनाक्षीचं नाव फेम सिनेमाचे एमडी आदित्य श्रॉफ याच्याशीही जोडलं गेलं होतं. एका रिपोर्टनुसार, ‘दबंग’ मधून डेब्यू केल्यानंतर काही काळातच सोनाक्षीने आदित्यला डेट करण्यास सुरूवात केली. मात्र त्यांच नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यानी वेगळं होण्याचा निर्णय घेत ब्रेकअप केलं.
कधी होणार सोनाक्षीचं लग्न ?
रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि झहीर इक्बालचा विवाह 23 जूनला आहे. मुंबईतील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे एक कार्डही व्हायरल होत आहे, त्यानुसार या लग्नात लाल रंगाचा पोशाख घालून येण्यास मनाई आहे. सोनाक्षी आणि झहीरची इच्छा आहे की लोकांनी त्यांच्या लग्नात फॉर्मल किंवा छान, सेलिब्रेशनचे कपडे घालून यावे.