सोनम कपूर रॅम्प वॉक करताना ढसाढसा रडू लागली; नक्की काय झाल? भावनिक व्हिडिओ
अभिनेत्री सोनम कपूरचा रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती रॅम्प वॉक करताना अचानक भावूक झाली आणि हुंदके देत रडू लागली. असं अचानक झालेलं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली तरी ती इतर अॅक्टीव्हिटींमध्ये कायम सहभाग घेताना दिसेत. जसं की फोटोशूट, फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक, तसेच ती सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. दरम्यान सोनम तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. तिची स्टाइल नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. इव्हेंट असो किंवा सोशल मीडिया, सोनमचा लूक नेहमीच चर्चेत असतो.
सोनमचा रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नुकतीच सोनम कपूर एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. मात्र सोनमचा हा रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामागे कारणही खास आहे. कारण हा रॅम्प वॉक करते वेळी अचानक सोनम भावूक झाली रडू लागली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
सोनम अचानक भावूक का झाली?
प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल याचं गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी निधन झालं. या शोदरम्यान सोनम कपूर, करीना कपूर, अनन्या पांडे यांसारख्या मोठ्या व्यक्तींनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली.
सोनम रोहित बलने डिझाइन केलेल्या आउटफिट्समध्ये अनेकदा दिसली होती आणि तिने त्याच्यासाठी रॅम्प वॉकही केला होता. त्याच्यासोबत सोनमची मैत्री फार घट्ट होती. त्यामुळे या शो दरम्यान रोहित बलची आठवण आल्याने सोनम भावूक होऊन रडायला लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोनमचा लूक आणि मेकअप कसा होता?
या रॅम्प वॉक दरम्यान सोनम कपूरने ऑफ-व्हाइट ड्रेस परिधान केला होता आणि त्यावर डिझायनर श्रग कॅरी केला होता. तिच्या केसात गुलाबची फुलेही माळण्यात आली होती. तसेच तिच्या हातातही गुलाब होते.तसेच हलका मेकअप आणि गडद लिपस्टिकने तिचे सौंदर्य आणखी वाढले होते. या लूकमध्ये सोनम खूपच गोड आणि सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
मित्राच्या आठवणीने भावूक
शोनंतर एएनआयशी बोलताना सोनम म्हणाली, “गुड्डा (रोहित बल) साठी इथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. त्यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान करून त्याच्यासाठी रॅम्पवॉक करण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्याचा शेवटचा शो माझ्यासाठी खूप खास आणि भावनिक होता. रोहित बलच्या डिझाईन्सचे कौतुक करताना सोनम म्हणाली की, त्याच्या डिझाईन्स अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर होत्या, यामुळेच ते आउटफिट एवढे खास बनायचे.” असं म्हणत तिने मित्राची आठवण काढली.
सोनमच्या कामाबद्दल…
सोनम कपूरने तिचा शेवटचा चित्रपट ‘ब्लाइंड’ 2023 मध्ये केला होता, जो तिने तिच्या गरोदरपणापूर्वी शूट केला होता. मुलगा वायुच्या जन्मानंतर सोनम काही काळ चित्रपटांपासून दूर राहिली, पण ती अनेकदा इव्हेंट्स आणि शोमध्ये दिसते.