‘सिकंदर’ मध्ये दिसणार सलमान खानची ‘ही’ एक्स गर्लफ्रेंड, अनेकदा राहिलीये सलमानच्या घरी
सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा सलमान खानची एक्स गर्लफ्रेंडही महत्त्वाचा भाग असणार आहे. या चित्रपटात तिचीही झलक दिसणार आहे. सध्या याबाबत सलमान खानने मात्र काही रिव्हिल केलं नाहीये.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्च रोजी प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता प्रेक्षक हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्याची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरपूर्वीच चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे.
सिकंदरमध्ये सलमानची एक्स गर्लफ्रेंड
‘सिकंदर नाचे’ हे गाणेही चाहत्यांना आवडले. ‘सिकंदर’मध्ये दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी गायलेले ‘लग जा गले’ हे सुपरहिट गाणे देखील पुन्हा तयार करण्यात आले आहे. पण खास गोष्ट म्हणजे या गाण्याला सलमान खानची कथित गर्लफ्रेंडने आवाज दिला आहे. होय सलमानची एक्स गर्लफ्रेंडही या चित्रपटाचा भाग असणार आहे. ‘सिकंदर’मधील ‘लग जा गले’ हे गाणे ट्रेलरमध्ये रश्मिका मंदान्ना गाताना दिसत आहे. त्याच वेळी, सलमान आणि त्या दोघांमधील प्रेमकहाणी देखील दाखवण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरने चित्रपटातील गाण्याला तिचा आवाज दिला आहे.
View this post on Instagram
चित्रपटातील गाण्याला ‘तिचा’ आवाज
‘सिकंदर’च्या ट्रेलरमध्ये ‘लग जा गले’ हे गाणे ऐकल्यानंतर चाहत्यांना वाटते की ते गाणे खरोखरच रश्मिका मंदान्नाने गायलं आहे. पणहे गाणं लुलियाने गायलं आहे. याआधीही लुलियाने सलमान खानच्या ‘राधे – युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातील ‘सीटी मार’ आणि ‘झूम झूम’ या दोन गाण्यांना आवाज दिला आहे. तसेच तिने सलमानच्या 2018 मध्ये आलेल्या ‘रेस 3’ चित्रपटातील ‘सेल्फिश’ आणि ‘पार्टी चले ऑन’ सारखी गाणी देखील गायली. तर लुलियाने ‘रात बाकी’ गाण्याच्या रीक्रिएट वर्जनलाही तिचा आवाज दिला आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान खान आणि लुलिया वंतूर सुट्टीसाठी रवाना
सिकंदर हा चित्रपट 30 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त, या चित्रपटात शर्मन जोशी, सत्यराज, प्रतीक बब्बर आणि अंजिनी धवन यांच्याही भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केले आहे तर निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान खान आणि लुलिया वंतूर सुट्टीसाठी रवाना झाले आहेत. तथापि, ते दोघे कुठे गेले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही एका खाजगी टर्मिनलवर एकत्र दिसले.