Sonu Nigam | ‘हिंदू असल्याने म्हणू शकतो, यावेळी कुंभमेळा व्हायला नको होता’, कोरोनाच्या विस्फोटानंतर सोनू निगम संतापला!

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज हजारो लोकांना या विषाणूचा संसर्ग होत आहे आणि बरेच लोक यामुळे आपला जीवही गमावत आहेत. त्या काळातील दाहकता लक्षात घेऊन गायक सोनू निगम (Sonu Nigam)  याने कोरोनाच्या सद्य स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Sonu Nigam | ‘हिंदू असल्याने म्हणू शकतो, यावेळी कुंभमेळा व्हायला नको होता’, कोरोनाच्या विस्फोटानंतर सोनू निगम संतापला!
सोनू निगम
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 2:23 PM

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज हजारो लोकांना या विषाणूचा संसर्ग होत आहे आणि बरेच लोक यामुळे आपला जीवही गमावत आहेत. त्या काळातील दाहकता लक्षात घेऊन गायक सोनू निगम (Sonu Nigam)  याने कोरोनाच्या सद्य स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोनूने त्याच्या घरातील एक व्यक्ती आजारी असल्याचे सांगत म्हटले की, सद्य देश आणि डॉक्टरांची प्रकृती खूपच वाईट आहे. तसेच, यावेळी सोनू निगमने कुंभमेळ्यावर देखील संताप व्यक्त केला (Sonu Nigam angry reaction on Kumbha mela).

कुंभमेळा नको होता : सोनू निगम

गायक सोनू निगमने आपला व्हिडीओ ब्लॉग दुपारी तीन वाजता बनवला असून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू म्हणतो की, “मी दुसर्‍या कुणाबद्दल काही सांगू शकत नाही, परंतु हिंदू असल्याने मी नक्कीच असे म्हणू शकतो यावेळी कुंभमेळा नाही व्हायला हवा होता. परंतु, हे चांगले आहे की थोडीशी लवकर अक्कल आली आणि पुढे तो प्रतीकात्मकरित्या साजरा करण्याचे ठरवले आहे. मी त्यांची भावना समजतो. पण सध्याच्या घडीला लोकांच्या जीवनापेक्षा आणखी काहीही महत्त्वाचे नाही.”

पाहा सोनू निगमचा व्हिडीओ

 (Sonu Nigam angry reaction on Kumbha mela)

सोनू म्हणतो, “तुम्हाला काय वाटतं आम्हाला शो करावं असं मन नाही करत का? पण मी समजतो की, आता या परीस्थितीत असे कार्यक्रम होऊ नये. गायक असल्याने मी असेही म्हणेन की, कदाचित सोशल डिस्टेंसिंग लक्षात घेऊन शो केले जाऊ शकतात. पण स्थिती अत्यंत वाईट आहे. आपण हे समजून घेतलेच पाहिजे.” सोनूने याबद्दल असेही सांगितले की, लोकांना त्रास होत आहे, जवळपास गेले सव्वा वर्ष लोकांकडे काही काम नाहीय. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या व्यतिरिक्त त्याने हे देखील सांगितले की, त्यांचे एक वरिष्ठ सहकारी आणि त्यांची पत्नी देखील कोरोनाचा सामना करत आहेत.

‘या’ कलाकारांनीही व्यक्त केली नाराजी

सोनू निगमच्या आधी अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या गर्दीवर आणि त्यातील कोरोना विस्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली होती. इन्स्टाग्रामवर कुंभमेळ्याचे छायाचित्र शेअर करताना तिने लिहिले की, ‘हे महामारीचे युग आहे, पण हे खूप धक्कादायक आहे’. या व्यतिरिक्त दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले की, ‘लोक आपले कर्म धुण्यासाठी गंगेमध्ये डुबकी घेत आहेत आणि त्यांना आशीर्वादात कोरोना मिळत आहे.’

(Sonu Nigam angry reaction on Kumbha mela)

हेही वाचा :

धार्मिक तेढ निर्माण करत आल्याचा आरोप, ‘त्या’ ट्विटनंतर अभिनेते मनोज जोशींवर संतापले नेटकरी!

Corona Vaccine Shortage | रजिस्ट्रेशन करूनही लस मिळत नाहीय, अभिनेत्रीने ट्विटरद्वारे व्यक्त केली चिंता!

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.