Sonu Sood | ऑनलाईन अभ्यासासाठी ‘झाडावरची कसरत’, मोबाईल टॉवरसाठी सोनू सूदची मदत!
हरियाणाच्या मोरनी खेड्यातील मुले स्लो-इंटरनेटमुळे हैराण झाली होती. मोबाईल नेटवर्क नसल्याने त्यांना ऑनलाइन अभ्यास करता येत नव्हता.
मुंबई : लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना केलेल्या मदतीमुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चर्चेत आला. स्थलांतरित कामगारांना नुसतीच प्रवासापुरती मदत करून तो थांबला नाही. त्याने आपल्या मदतकार्याच्या सीमा आणखी विस्तारल्या. ज्यांनी कोणी त्याच्या मदतीची अपेक्षा केली, त्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी सोनू सूद पुढे आला. यावेळेस त्याने चक्क मोबाईल टॉवर (Mobile Tower) लावून देत एका खेड्यातील मुलांना मदत केली आहे (Sonu Sood installed Mobile tower in morni village of Haryana).
हरियाणातील एका गावात स्लो-इंटरनेट स्पीडमुळे तिथल्या विद्यार्थ्यांना झाडावर चढून अभ्यास करावा लागत होता. ही गोष्ट सोनू सूदच्या लक्षात येताच, त्याने या गावात थेट मोबाईल टॉवरची (Mobile Tower) व्यवस्था करून दिली. स्लो-इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन अभ्यासात अडथळा येत होता. शिक्षणासाठी त्यांना ‘झाडावरची कसरत’ करावी लागत होती.
Help change the world ? @Karan_Gilhotra https://t.co/GrDhd12x1R
— sonu sood (@SonuSood) October 5, 2020
व्हायरल व्हिडीओने बदलले गावाचे भविष्य
हरियाणाच्या मोरनी खेड्यातील मुले स्लो-इंटरनेटमुळे हैराण झाली होती. मोबाईल नेटवर्क नसल्याने त्यांना ऑनलाइन अभ्यास करता येत नव्हता. या गोष्टींची माहिती मिळताच सोनू सूदने (Sonu Sood) मित्र करण गिल्होत्रा याच्या मदतीने गावात एक मोबाईल टॉवर (Mobile Tower) बसविला. ज्यामुळे आता तिथल्या मुलांना जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे सोनूला या मुलांच्या समस्येबद्दल माहिती मिळाली. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, गृहपाठ करण्यासाठी एक लहानगा मुलगा झाडाच्या फांदीवर बसून मोबाईल सिग्नल शोधत होता. या व्हिडीओ पोस्टमध्ये सोनू आणि करण यांना या टॅग केले गेले होते, त्यामुळेच हा व्हिडीओ सोनू सूदपर्यंत पोहोचला. (Sonu Sood installed Mobile tower in morni village of Haryana)
याबद्दल बोलताना सोनू सूद (Sonu Sood) म्हणाला, ‘मुले ही आपल्या देशाचे भविष्य असतात आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी बरोबरीची संधी मिळाली पाहिजे. मला असे वाटते की, अशा समस्यांमुळे कोणाच्याही यशाच्या मार्गात अडथळा येऊ नये. मुलांना ऑनलाईन अभ्यासात मदत करण्यासाठी मी दुर्गम गावात मोबाईल टॉवर उभारला आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आता मोबाइल सिग्नलसाठी मुलांना झाडाच्या फांद्यावर बसण्याची गरज नाही.’
संयुक्त राष्ट्र संघाकडून सोनूचा सन्मान
या आधी सोनू सूदने चंदीगडमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होण्यासाठी स्मार्टफोनचे वितरणही केले होते. दरम्यान, सोनू सूदच्या या कार्याची दाखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली आहे. महामारी काळात समाजकार्य केल्याबद्दल सोनू सूदला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात (यूएनडीपी) विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(Sonu Sood installed Mobile tower in morni village of Haryana)
संबंधित बातम्या :
Sonu Sood | कठीण काळात माणुसकीचे दर्शन, सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान
बैलांच्या जागेवर मुलींना जुंपून शेत नांगरलं, सोनू सूदकडून शेतकऱ्याला घरपोच ट्रॅक्टर
‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट