Sonu Sood | विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली म्हणून सोनू सूदने चालवली सायकल, कोरोनाचे नियम विसरल्याने झाला ट्रोल!

‘मसीहा’ ठरलेला बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सतत काहीना काही कारणाने चर्चेत असतो. कधीकधी तो लोकांना मदत करण्यामुळे त्याची चर्चा असते, तर कधीकधी त्याच्या सोशल मीडिया व्हिडीओंमुळे तो चर्चेत असतो. आता पुन्हा त्याचा एक नाव व्हिडीओ समोर आला आहे.

Sonu Sood | विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली म्हणून सोनू सूदने चालवली सायकल, कोरोनाचे नियम विसरल्याने झाला ट्रोल!
सोनू सूद
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 10:26 AM

मुंबई : ‘मसीहा’ ठरलेला बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सतत काहीना काही कारणाने चर्चेत असतो. कधीकधी तो लोकांना मदत करण्यामुळे त्याची चर्चा असते, तर कधीकधी त्याच्या सोशल मीडिया व्हिडीओंमुळे तो चर्चेत असतो. आता पुन्हा त्याचा एक नाव व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूद सायकल चालवताना दिसत आहे. सोनू सूद याने विद्यार्थ्यांसाठी सायकल चालवली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्यानंतर आणि पुढे ढकलल्यानंतर त्यानी हे काम केले आहे. या सायकल राईडबद्दल सोनू सूदचे केवळ कौतुकच केले जात नाहीय, तर त्यापेक्षाही जास्त त्याला ट्रोल केले जात आहे (Sonu Sood ride cycle on road without mask gets troll on social media).

सोनूला पडला मास्कचा विसर

वास्तविक, या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, सोनू सूदने सुरुवातीला काळ्या रंगाचा मास्क लावला होता. परंतु, व्हिडीओ जसा पुढे जात आहे, तसतसे त्याच्या चेहऱ्यावरुन मास्क गायब झाल्यासारखे दिसते आहे. अशा परिस्थितीत लोक सोनू सूदवर सडकून टीका करत आहेत. लोक म्हणतात की, कोरोना काळात सोनूने असे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

अभिनेता सोनू सूद यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते आणि सरकारच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांना पाठिंबा देत सोनू सुरुवातीपासूनच सर्वांसमोर आपली बाजू मांडत आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूद आपल्या सायकल राईड दरम्यान फिटनेस गिअर्स घालून सायकल चालवताना दिसत आहे. सोनूने शॉर्ट्स, सँडो आणि स्पोर्ट्स शूज घातले होते. सोनू सूदच्या या एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये त्याने बहुतेक वेळी मास्क घातलेला नाही. तसेच, हा व्हिडीओ आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांनी पाहिलेला आणि  त्यांना तो आवडला देखील आहे. बरेच लोक सोनूचे कौतुकही करत आहेत, कारण त्याने विद्यार्थ्यांच्या हिताबद्दल विचार केला होता (Sonu Sood ride cycle on road without mask gets troll on social media).

सोनूचे मजेदार व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये असून, हा व्हिडीओही हैदराबादच्या रस्त्यावर शूट करण्यात आला आहे. तसेच, कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळापासून सोनू सूद सोशल मीडियावर खूपच सक्रिय झाला आहे आणि त्याने लोकांना खूप मदत केली. लोकांना मदत करण्याची त्याची ही सेवा अद्याप सुरू आहे. यासह सोनू सूद सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओही पोस्ट करत असतो. यातील काही व्हिडीओंमध्ये तो डोसा बनवताना दिसतो, तर तो काहींमध्ये बँड वाजवताना.. त्याचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात.

(Sonu Sood ride cycle on road without mask gets troll on social media)

हेही वाचा :

Yo Yo Honey Singh | कथकसोबत वेस्टर्न डान्स, रॅपर योयो हनी सिंगचा कॉलेजमधील व्हिडीओ चर्चेत!

Preity Zinta | अंडरवर्ल्डच्या धमक्यांनंतरही न घाबरता प्रिती झिंटाने नोंदवला होता जबाब, वाचा नेमकं काय घडलं…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.