Sonu Sood | शाकाहारी अन्न खाऊन सोनूने बनवली पिळदार शरीरयष्टी, नवा फोटो पाहून चाहतेही झाले मुग्ध!

या पिळदार शरीरयष्टीसाठी सोनू सूदने पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने बनवलेला आहार घेतला आहे. त्याचवेळी या व्हिडीओमध्ये अभिनेता प्लँक व्यायाम करताना दिसत आहे.

Sonu Sood | शाकाहारी अन्न खाऊन सोनूने बनवली पिळदार शरीरयष्टी, नवा फोटो पाहून चाहतेही झाले मुग्ध!
सोनू सूद
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 12:28 PM

मुंबई : बॉलिवूडचा बहुचर्चित अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. लोकांचे दुःख-समस्या दूर करण्यासाठी तो नेहमी मदतीसाठी हात पुढे करत असतो. सोनू अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून गरजू लोकांशी संपर्क साधतो आणि त्यांच्या समस्या सोडवतो. अभिनय आणि लोकांची मदत याशिवाय सोनू सूदला पिळदार शरीरयष्टी बनवण्याची देखील खूप आवड आहे. नुकतेच सोनू सूदने त्याचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची बेस्ट स्टाईल पाहायला मिळत आहे. या फोटोत त्याची पिळदार शरीरयष्टी पाहायला मिळत आहे. फारच कमी लोकांना माहिती आहे की, सोनू फक्त शाकाहारी भोजन खातो. ज्यामुळे तो स्वत:ला इतका तंदुरुस्त ठेवू शकतो (Sonu Sood share 6 pack abs body photo on social media).

या फोटोत सोनू सूदचे संपूर्ण शरीर दिसत आहे. अभिनेत्याने ही शरीरयष्टी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे दिसते आहे. सोनू सूद त्याच्या आगामी चित्रपटासाठी जोरदार तयारी करत आहे. सोनूच्या शरीरावरचे कट्स पाहून हे कळते आहे की, अशी पिळदार शरीरयष्टी तयार करण्यासाठी त्याने कोणत्या प्रकारचे डाएट पाळला असावा.

पाहा सोनूची मेहनत

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

 (Sonu Sood share 6 pack abs body photo on social media)

शाकाहारी डाएट!

या पिळदार शरीरयष्टीसाठी सोनू सूदने पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने बनवलेला आहार घेतला आहे. त्याचवेळी या व्हिडीओमध्ये अभिनेता प्लँक व्यायाम करताना दिसत आहे. तो केवळ प्लँक व्यायाम करत आहे असे नाही, तर सोनू सूदवर दोन लोकही बसलेले आहेत. या दोघांचे वजन पेलून सोनू व्यायाम करत असल्याचे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

सोनूवर स्वार होणार्‍या दोघांचे वजन सुमारे 154 किलो आहे. सोनूने हा व्हिडीओ ट्वीट करून लिहिले की, ‘प्लँक डे’. या बरोबरच इतर लोकांनी ‘असा प्रयत्न करू नका’, असा इशारादेखील देण्यात आला आहे.

‘मसीहा’!

सध्या सोनू सूद भारतातील सर्वात मोठ्या चेहर्‍यांमध्ये सामील झाला आहे. सोनू सूदवर देशभरातीलच नव्हे तर, जगभरातील चाहते भरभरून प्रेम करत आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या अभिनेत्याने बर्‍याच लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यास मदत केली. एवढेच नव्हे, तर त्याने लोकांना काम दिले आणि घरापासून जेवणापर्यंत सर्वांना खूप मदत केली. सोनू सूद यांच्या चांगल्या कामामुळे देशभरात त्याची प्रतिमा उंचावली आहे. सध्या सोनूकडे अनेक मोठे चित्रपट, तसेच बर्‍याच मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती आहेत.

(Sonu Sood share 6 pack abs body photo on social media)

हेही वाचा :

Sooryavanshi | अक्षय-कतरिनाच्या ‘सूर्यवंशी’वर कोरोनाची टांगती तलवार! प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार?

उमेश कामत-प्रिया बापट यांची कोरोनावर मात, लवकरच चित्रीकरणावर परतणार!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.