Sherni : लवकरच ‘शेरनी’चा ग्लोबल प्रीमियर, विद्या बालन झळकणार मुख्य भूमिकेत

डायरेक्ट-टू-स्ट्रीम हिंदी अमेझॉन (Amazon) ओरीजनल सिनेमा 'शेरनी'चा ग्लोबल प्रीमियर लवकरच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या वतीनं करण्यात आलीये. (Soon the global premiere of 'Sherni', Vidya Balan will play the lead role)

Sherni : लवकरच 'शेरनी'चा ग्लोबल प्रीमियर, विद्या बालन झळकणार मुख्य भूमिकेत
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 2:13 PM

मुंबई : सध्या ओटीटीवर नवनवीन चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत. आता बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शेरनी’ (Sherni) बद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. डायरेक्ट-टू-स्ट्रीम हिंदी अमेझॉन (Amazon) ओरीजनल सिनेमा ‘शेरनी’चा ग्लोबल प्रीमियर लवकरच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या वतीनं करण्यात आलीये. आपल्या खास शैलीसाठी चर्चेत असलेला फिल्ममेकर अमित मसुरकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक आहे.

विद्या बालन सोबतच ‘हे’ कलाकार साकारणार महत्त्वाची भूमिका

या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन झळकणार आहेत तर सोबतच शरद सक्सेना, मुकूल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे अष्टपैलू कलाकार या चित्रपटाला अधिक मजबूत बनवतील. महत्त्वाचं म्हणजे नेहमीच एका वेगळ्या अंदाजात दिसणारी आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री विद्या बालन आता पुन्हा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेरनी’ या चित्रपटाचं कथानक खिळवून टाकणारं असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या आश्वासक भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची मेजवानी

2020 मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, या चित्रपटातही विद्या बालनला प्रचंड उत्तम प्रतिसाद मिळाला होता.  या चित्रपटाला मिळालेल्या भरगोस यशानंतर अबंडनतिया एंटरटेनमेंटची ही नवीनकोरी कलाकृती ‘शेरनी’च्या माध्यमातून जगासमोर येतेय. शेरनीचं कथानक फारच विशेष आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे अभिनेत्री विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची मेजवानी असणार हे नक्की आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत विद्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शेरनी’चं ‘फर्स्ट डे फर्स्ट स्ट्रीम’ आता लवकरच होणार आहे.

विद्या बालननं शेअर केली खास पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

संबंधित बातम्या

Photo: गालावर खळी, दिलखुलास हास्य… मिसेस चांदेकरचा क्लासी अंदाज, फोटो पाहाच!

Miss Universe 2020 : तोतरेपणा, शरीरावर डाग, तरीही अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो अशी पोहोचली ‘मिस युनिव्हर्स’पर्यंत

Photo : मेक्सिकोची अँड्रिया मेझा ठरली मिस युनिव्हर्स, भारत ‘या’ क्रमांकावर

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.