मुंबई : सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलंय. अशात आरोग्य यंत्रणा दिवसरात्र एक करत कामाला लागली आहे. या महामारीनं आपण सगळेच घरात अडकलेलो आहोत. मात्र असं असतानाही आपली आरोग्य यंत्रणा अर्थात सर्व डॉक्टर्स, नर्स आणि एवढंच नाही तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीसुद्धा कोरोनाला रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या डॉक्टरांसाठी पुण्यातील काही तरुणांनी मिळून हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांना ‘धन्यवाद’ आणि ‘सॉरी’ म्हणण्याचा प्रयत्न केला आहे.
पाहा व्हिडीओ
‘आदर्णीय डॉक्टर्स…’
अशा परिस्थितीत डॉक्टर्स किती हतबल झालेले आहेत हे आपण अनेक फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून बघितलं आहे. आपल्या घरच्यांना संसर्ग होऊ नये म्हणून अनेक डॉक्टर त्यांच्या घरापासून लांब आहेत. मात्र त्यांच्या या कष्टाचे पांग आपण त्यांच्यावर हल्ले करून, त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फेडत आहोत, असं काहीस चित्र अनेक ठिकाणी दिसून आलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 244 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र आपण फारसं त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र त्या डॉक्टरांचंही कुटुंब आहे हा विचार आपल्या मनात आलाच नसावा. आपण जाऊन रुग्णांची सेवा करू शकत नाही, मात्र आपल्या विनाकारण फिरण्यानं आरोग्य यंत्रणेवर ताण येतो आणि त्याचा त्रास मात्र डॉक्टरांना होतो हा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
लेखन रत्नदिप शिंदे आणि सादरीकरण संदेश पवार
पुण्यातील काही तरुणांनी मिळून हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांना ‘धन्यवाद’ आणि ‘सॉरी’ म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. याचं लेखन रत्नदिप शिंदे यानं केलं असून वाचन संदेश पवार यानं केलं आहे. लेखकानं आपल्या भावना खूप उत्कृष्ट पद्धतीनं मांडल्या असून या व्हिडीओचं संकलन सायली अयाचित हिनं केलं आहे. देवेंद्र चरणकर, जयवर्धन खोत, कुणाल शर्मा, समृद्धी देशपांडे, अभिषेक देशपांडे, शुभंकर वाघोले, यशराज आवेकर, अजिंक्य कुलकर्णी यांनी या व्हिडीओसाठी खास मेहनत घेतली आहे.
संबंधित बातम्या
Photo: चेहऱ्यावर दिलखुलास हास्य, डोळ्यात नजाकत; श्रुती मराठेच्या सौंदर्यावर सर्वच घायाळ
Photo : 17 साल बाद… फ्रेंड्सचं रियुनियन, पाहा कलाकारांचं बदललेलं रुप