बॉलिवूडपेक्षा तगडी फी, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ सिनेमासाठी घेतलेली रक्कम ऐकून डोळे चक्रावतील!
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या चाहत्यांची यादी तशी खूप लांब आहे. प्रत्येक फॅन आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात.
मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या चाहत्यांची यादी तशी खूप लांब आहे. प्रत्येक फॅन आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. अल्लूचा चित्रपट प्रदर्शित होताच सुपर हिट ठरतोच. अशा परिस्थितीत अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या आगामी ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याचे आगामी चित्रपटासाठीचे मानधन हा विषय सध्या खूप चर्चेत आला आहे (South Superstar Allu Arjun takes 50 cr fee for pushpa film).
या चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या भागाचेही शूटिंग करण्यात आले आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांचा ‘पुष्पा’ हा चित्रपट मेकर्स 2 पार्ट्समध्ये रिलीज करणार आहेत. ज्यानंतर चाहते या चित्रपटाबद्दल अजून उत्साही झाले आहेत.
अर्जुनने पुष्पासाठी आकारले ‘इतके’ मानधन
अलीकडेच या चित्रपटाविषयी एक मोठी गोष्ट समोर आली आहे, ज्याचे कनेक्शन थेट अल्लू अर्जुनशी आहे. दक्षिणात्या मनोरंजन विश्वाचा स्टार अल्लू अर्जुन या बहुप्रतीक्षित चित्रपटासाठी तगडे मानधन घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. झूमच्या वृत्तानुसार, अभिनेत्याने या चित्रपटासाठी तब्बल 50 कोटी मानधन आकारले आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, अल्लू अर्जुन ‘पुष्पा’साठी 50 कोटी रुपये इतका मोठा मोबदला घेतला आहे. तथापि, अद्याप या प्रकरणाची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाची निर्मिती अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांचे मेहुणे साहेब मुत्तमसेती यांनी केली आहे. तसेच, सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत (South Superstar Allu Arjun takes 50 cr fee for pushpa film).
टीझरला प्रचंड प्रतिसाद
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते याबद्दल उत्सुक झाले आहेत. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनच्या मानधनाचे वृत्त समोर आले असल्याने चाहते आणखीनच उत्साही झाले आहेत. पुष्पामध्ये शनल पुरस्कार विजेता अभिनेता फहाद फासिल मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
अल्लू अर्जुनची कोरोनावर मात
अलीकडेच दक्षिणात्या सुपर स्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली होती. ही माहिती अभिनेत्याने स्वतः शेअर केली होती. त्यानंतर फिल्मस्टारने स्वत:ला क्वारंटाईन केले आणि तो बराच काळ घरात अलिप्त राहिला. त्यानंतर त्याला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. आता हा लाडका अभिनेता कोरोना मुक्त झाला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो कोरोना मुक्त झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या मुलांना भेटताना दिसला.
(South Superstar Allu Arjun takes 50 cr fee for pushpa film)
हेही वाचा :
PHOTO | ‘तू, मी आणि पुरणपोळी’, ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी आता चित्रपट रुपात प्रेक्षकांच्या भेटीला!
PHOTO | पाकिस्तान ते अमेरिका ‘या’ आहेत अनुष्का शर्माच्या ‘लूक-अ-लाईक’, पाहा किती जुळतात यांचे चेहरे…
‘कोको’ हरवलाय, शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस! ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीची घोषणा#NidhhiAgerwal | #Coco | #Entertainment https://t.co/rBylGpa7QB
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2021