VIDEO | चाहत्याची मिठी सुपरस्टार Pawan Kalyan यांच्या अंगलट, धावत्या कारखाली येताना थोडक्यात वाचले

पवन कल्याण त्यांच्या कारवर चढून लोकांना अभिवादन करत होते, तेव्हा त्यांचा एक अतिउत्साही चाहता त्यांच्या कारवर चढला. त्याने पवन कल्याण यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल गेल्याने दोघेही पडले.

VIDEO | चाहत्याची मिठी सुपरस्टार Pawan Kalyan यांच्या अंगलट, धावत्या कारखाली येताना थोडक्यात वाचले
अभिनेते पवन कल्याण कारवरुन पडताना थोडक्यात वाचले
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 7:44 AM

कर्नाटक : चाहत्याची मिठी दाक्षिणात्य सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचे (JanaSena Party) सर्वेसर्वा पवन कल्याण (Pawan Kalyan) यांना चांगलीच महागात पडली असती. राजकीय रॅलीमध्ये धावत्या कारच्या टपावर उभे राहिलेने टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण चाहत्याच्या अतिउत्साहामुळे खाली पडणार होते. मात्र त्यांनी वेळीच स्वतःला सावरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि स्वतःच्याच कारखाली येण्यापासून ते वाचले. आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. अतिउत्साही चाहता पवन कल्याण यांच्या कारवर चढला. या जबरा फॅनने त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल गेल्याने दोघेही पडले. पवन कल्याण गाडीवरच पडल्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली नाही.

नेमकं काय घडलं?

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पवन कल्याण आपल्या पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान रोड शो करत होते. यावेळी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन कल्याण त्यांच्या कारवर चढून लोकांना अभिवादन करत होते, तेव्हा त्यांचा एक अतिउत्साही चाहता त्यांच्या कारवर चढला. त्याने पवन कल्याण यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल गेल्याने दोघेही पडले. पवन कल्याण गाडीवरच पडले, तर त्यांचा चाहता कारच्या खाली पडला. पवन कल्याण खाली पडले असते, तर त्यांना दुखापत होऊ शकली असती. पण सुदैवाने ते गाडीच्या टपावरच पडल्याने मोठा अनर्थ टळला.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पवन कल्याण सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, मात्र अशा घटनांमुळे या सेलिब्रिटींच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशा प्रकारच्या घटना घडू न देणं, ही सुरक्षा रक्षकांची जबाबदारी आहे. पवन कल्याण राजकारणासोबतच चित्रपटांमध्येही सक्रिय आहे. ते पक्षाच्या प्रचार कार्यक्रमातही सक्रियपणे सहभागी होतात. रोड शो दरम्यान घडलेल्या या घटनेबद्दल पवन कल्याण किंवा त्यांच्या पक्षाकडून कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही.

‘भीमला नायक’ चित्रपटामुळे चर्चेत

पवन कल्याण सध्या त्यांच्या आगामी ‘भीमला नायक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ते पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत राणा दग्गुबती, नित्या मेनन आणि संयुक्ता मेनन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सागर के चंद्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 25 फेब्रुवारी 2022 रोजी तो रिलीज होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Dadasaheb Phalke Award : रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘शेरशाह’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ‘पुष्पा’चाही बोलबाला

फरहानच्या लग्नात ह्रतिकने पुन्हा धरला ‘सेनोरिटा’वर ठेका; जिंदगी ना मिलेगी दोबारातील डान्स रिक्रिएट

अभिनेत्री जायरा वसीमची हिजाबच्या वादामध्ये उडी, भली मोठी पोस्ट शेअर करत म्हणाली की…मी संपूर्ण व्यवस्थेचा विरोध करते…

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.