Varun-Natasha Wedding : वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी खास बंदोबस्त, लग्नस्थळी मोबाईल वापरण्यास मनाई

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या विधींना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. (Special arrangements for Varun and Natasha's wedding)

Varun-Natasha Wedding : वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी खास बंदोबस्त, लग्नस्थळी मोबाईल वापरण्यास मनाई
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 11:40 AM

मुंबई : वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या विधींना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी रोजी दोघं अलिबागमध्ये लग्न करणार आहेत. शुक्रवारी कुटुंबिय आणि खास मित्र अलिबागमध्ये पोहोचले आहेत. आज वरुण आणि नताशा यांचं संगीत होणार आहे ज्यात बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स हजेरी लावतील. डेव्हिड धवननं मुलाच्या लग्नासाठी खास व्यवस्था केली आहे. या जोडप्याच्या गोपनीयतेत कुणीही हस्तक्षेप करु नये म्हणून मॅन्शन हाऊसच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार मॅन्शन हाऊसभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत, तर प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. जेणेकरून लग्नात कोणताही हस्तक्षेप होणार नाही.

लग्नात काम करणा कर्मचार्‍यांनाही विशेष विनंती करण्यात आली आहे. डेव्हिड धवन हे लग्न खूप खासगी ठेवू इच्छित आहे. अशा परिस्थितीत त्यांनी लग्नात काम करणा कर्मचार्‍यांकडून त्यांचा सेल फोन वापरण्यास नकार दिला आहे, जेणेकरुन कोणीही फोनवरुन लग्नात व्हिडिओ बनवू नये.

स्पॉटबॉयच्या अहवालानुसार धवन फॅमिलीसाठी पाहुण्यांची यादी तयार करणं सोपं नाहीये. डेव्हिड धवनचे मित्र, वरुणचा मित्र परिवार आणि नताशाचे मित्रही लग्नाला हजेरी लावू इच्छित आहे. जर त्यांना कुणी कॉल केला आणि लग्नाचे कार्ड आमच्याकडे पोहोचले नाही असं सांगितलं तर डेव्हिड धवन कॉलरचं नाव यादीत समाविष्ट करतात.

वरुण आणि नताशाच्या संगीतामध्ये त्यांचे बॉलीवूड मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलायका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर हे हजेरी लावणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वरुण आणि नताशाचं लग्न सूर्यास्तावेळी व्हावं अशी त्यांची इच्छा आहे, त्यामुळे ते अलिबाग बीचवर सूर्यास्ताच्या वेळी लग्न करतील. लग्नानंतर दोघंही पाहुण्यांसाठी रिसेप्शन ठेवणार आहेत.

संबंधित बातम्या 

मोत्यांच्या ड्रेसमध्ये दिसला नोराचा ‘मधुबाला’वाला लूक, डिझायनर कोण?

PHOTO | प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’च्या थुकरटवाडीत अवतरणार दिग्गज मंडळी!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.