Spotted : लग्न स्थळी वरुण धवनला केलं स्पॉट, लग्नाची जोरदार तयारी

वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. (Spotted Varun Dhawan at the wedding venue, strong preparations for the wedding)

Spotted : लग्न स्थळी वरुण धवनला केलं स्पॉट, लग्नाची जोरदार तयारी
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 4:02 PM

मुंबई : वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यासाठी वरुण,नताशा आणि कुटुंबिय अलिबागला पोहोचले आहेत. शनिवारी वरुण धवनला अलिबागमधील लग्नाच्या ठिकाणी स्पॉट केलंय. कारमधून खाली उतरल्यानंतर वरुणनं फोटोग्राफर्सला पोज दिली. वरुणच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता. पांढरा टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये वरुण स्मार्ट दिसत होता.

नताशा,तिचे कुटुंबिय आणि वरुण धवन त्याच्या कुटुंबियांसोबत शुक्रवारी अलिबागमध्ये पोहोचलेत. लोकप्रिय मेहंदी कलाकारही संध्याकाळी कार्यक्रमस्थळी पोहोचला, शुक्रवारी संध्याकाळी वरुणच्या नावाची मेहंदी नताशाच्या हातात लागणार आहे. आज संध्याकाळी वरुण आणि नताशा यांचा संगीत सोहळा आहेत. या सोहळ्यामध्ये करण जोहर, आलिया भट्ट, जाह्नवी कपूर आणि अर्जुन कपूर हजर होणार आहेत.

लग्न स्थळी खास सुरक्षा टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार मॅन्शन हाऊसभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत, तर प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. जेणेकरून लग्नात कोणताही हस्तक्षेप होणार नाही. लग्नात काम करणा कर्मचार्‍यांनाही विशेष विनंती करण्यात आली आहे. डेव्हिड धवन हे लग्न खूप खासगी ठेवू इच्छित आहे. अशा परिस्थितीत त्यांनी लग्नात काम करणा कर्मचार्‍यांकडून त्यांचा सेल फोन वापरण्यास नकार दिला आहे, जेणेकरुन कोणीही फोनवरुन लग्नात व्हिडिओ बनवू नये.

संगीत सोहळ्यात बॉलिवूडचे तारे वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात संगीत सोहळ्याने होईल. वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

आलिया भट्ट-रणबीर कपूरची जोडी जमणार वरुणची जिवलग मैत्रीण अभिनेत्री आलिया भट्टही लग्नाला हजेरी लावणार आहे. यावेळी, ती एकटी येणार नाही तर, रणबीर कपूरबरोबर या विवाहसोहळ्यात सामील होणार आहे. आलिया सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. पण, शूटिंगमधून ब्रेक घेत ती अलिबागला वरुणच्या लग्नात हजेरी लावणार आहे.

संबंधित बातम्या 

Varun-Natasha Wedding | वरुण-नताशाचे ‘ग्रँड वेडिंग’, नताशाचा ‘लेहंगा’ इंटरनेटवर चर्चेत, पाहा फोटो…

Varun-Natasha Wedding : वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी खास बंदोबस्त, लग्नस्थळी मोबाईल वापरण्यास मनाई

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.