SSR Drug Case | रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा, जामिनाविरोधातील याचिकेवरील पुन्हा सुनावणी होणार!
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर ती सुमारे एक महिना जेलमध्ये होती.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर ती सुमारे एक महिना जेलमध्ये होती. रिया सध्या जामिनावर बाहेर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. आता अलीकडेच एनसीबीने (NCB) रिया चक्रवर्ती हिच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर सुप्रीम कोर्टाने आज (18 मार्च) सुनावणी केली. आता या याचिकेवर आणखी पुढील तारीख देण्यात आली आहे (SSR Drugs Case NCB petition in supreme court against Rhea Chakraborty bail update).
ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला मिळालेल्या जामिनाविरूद्ध एनसीबीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, एनडीपीएस कायद्याबाबत हायकोर्टाने अनेक टिप्पण्या केल्या आहेत. सीजेआय म्हणाले की, तुम्ही फक्त टिप्पण्या विरोधात येथे आला आहात, तर जामीन रद्द करण्याची मागणी तुम्ही का करत आहात?. पुढे एसजी म्हणाले की, या याचिकेमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्हाला परवानगी हवी आहे. सीजेआयने यावर मान्यता दिली आणि पुढील तारीख सोमवारी म्हणजे 22 मार्च रोजी दिली. एसजींनी स्पष्टीकरण दिले की, आम्ही जामिनाविरूद्ध नाही तर, एनडीपीएसविरोधातील टिप्पण्यांविरूद्ध सुप्रीम कोर्टात आलो आहोत. ज्या पुढे खटला चालवणे कठीण करतील.
NCBने ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे
ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर केला होता, ज्याविरूद्ध आता NCBने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. वास्तविक, या प्रकरणात चौकशी सुरू असताना एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात आपले आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात रियासह 33 जणांवर आरोप केले गेले आहेत. या आरोपपत्रात रियावर एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्रात असा आरोप केला गेला आहे की, रिया नोव्हेंबर 2019पासून सुशांतला ड्रग्स पुरवत होती (SSR Drugs Case NCB petition in supreme court against Rhea Chakraborty bail update).
रियाचा जबाब
केंद्रीय एजन्सीनुसार रियाने कबूल केले आहे की, ती घरात ड्रग्ज आणत होती. नोव्हेंबर 2019मध्ये याची सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर रियाने यापूर्वी शोविककडे ड्रग्ससाठी पैसेही हस्तांतरित केले होते. ज्यामुळे आता एजन्सीने रियावर ड्रग्स खरेदी आणि ड्रग्ज पुरवठा केल्याचा आरोप केला आहे.
रियाने असेही सांगितले आहे की, सुशांतला गांजा आणि मारिजुआना देण्यात आला होता. आरोपपत्रात असेही लिहिले आहे की, रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि हृषीकेश पवार हे सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्ज खरेदी व पुरवठा करत असत. या क्षणी यापैकी काही आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात अद्याप तपास चालू आहे.
तपासादरम्यान, मेंदूच्या मज्जातंतूंच्या पेशींच्या असामान्य आणि जास्त क्रियाकलाप नियंत्रित करण्यासाठी असलेले अॅल्प्रझोलम आणि क्लोनाझेपॅम यासह चरस, गांजा, एलएसडी, एक्स्टसी हे ड्रग्ज आढळले आहेत. हे सर्व एनडीपीएस अधिनियम कलम 20 (बी), 22, 23 अन्वये जप्त केले आहेत. याशिवाय मोठ्याप्रमाणात भारतीय व विदेशी चलनेही हस्तगत केली आहेत.
(SSR Drugs Case NCB petition in supreme court against Rhea Chakraborty bail update)
हेही वाचा :
Vamika | विराट-अनुष्काच्या नेमप्लेटवर आता ‘वामिका’चंही नाव, पाहा हा क्युट Photo
कियारा अडवाणी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट, नुकतीच एकत्र घेतली होती ज्योतिष्याची भेट!
SSR Drugs Case | रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार, NCBकडून जामिनाविरोधात याचिका दाखल!#SSR | #SSRDrugsCase | #RheaChakraborty | #DrugsConnection | #NCB https://t.co/Yuv4mgBVPV
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2021