90 टक्के डॉक्टर राक्षस झालेत, आक्षेपार्ह भाषा अंगलट, कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा

डॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल सुनील पाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (Sunil Pal doctors evil )

90 टक्के डॉक्टर राक्षस झालेत, आक्षेपार्ह भाषा अंगलट, कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा
कॉमेडियन सुनिल पाल
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:05 PM

मुंबई : कोरोना काळात रुग्णसेवेसाठी वाहून देणाऱ्या डॉक्टरांची तुलना राक्षसांशी करणं स्टँड अप कॉमेडियन सुनील पाल (Sunil pal) यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सुनील पाल यांच्याविरोधात मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 505 (2), 500 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Stand Up Comedian Sunil Pal calls 90 percent doctors evil and fraud booked for defamation)

फ्रंटलाइन कर्मचारी कोरोना साथरोगाच्या काळात दिवसरात्र लोकांची मदत करण्यात गुंतले आहेत. डॉक्टर रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच स्टँड अप कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी डॉक्टरांना चोर आणि हैवान म्हटले आहे. त्यामुळे सुनील पाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

असोसिएट ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सच्या अध्यक्षा डॉक्टर सुष्मिता भटनागर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. डॉ. सुधीर नाईक यांनी सांगितले की, डॉ. भटनागर यांनी 20 एप्रिल रोजी पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिला होता.

सुनील पाल व्हिडीओमध्ये काय म्हणाले होते?

“डॉक्टर हे देवाचे रुप असतात, परंतु यावेळी 90 टक्के डॉक्टरांनी राक्षसाचे रुप धारण केले आहे. ते फसवणूक करत आहेत. कोविड बाधित असल्याचं सांगून लोकांना रुग्णालयात दाखल केले जात आहे, त्यांच्याकडून बिले आकारली जात आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर शरीरातून अनेक अवयवही काढून टाकले जात आहेत” असं व्हिडीओमध्ये सुनील पाल म्हणाले होते.

सुनील पाल यांचा माफीनामा

तक्रार दाखल झाल्यानंतर सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन माफीही मागितली आहे. ते म्हणाले की माझ्या बोलण्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल, तर माफी मागण्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. मी दिलगीर आहे. डॉक्टरांना अजूनही देव मानले जातात, या वक्तव्यावर अजूनही मी ठाम आहे, असं पाल म्हणाले.

“या कठीण काळात गरीब माणूस अस्वस्थ होत आहे. माझ्या व्हिडीओमध्ये मी 90 टक्के डॉक्टरांनी राक्षसाचे रुप धारण केल्याचे सांगितले आहे, उर्वरित 10 टक्के डॉक्टर अजूनही आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. जे लोक आपले कार्य प्रामाणिकपणे करत आहेत, त्यांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही” असे सांगत आपल्याला पोलिसांकडून अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नसल्याचे सुनील पाल यांनी स्पष्ट केले.

संंबंधित बातम्या :

Bharti Singh | ‘कामाची नशा करा, अमली पदार्थांची नाही’, मित्र सुनील पालचा भारतीला सल्ला!

(Stand Up Comedian Sunil Pal calls 90 percent doctors evil and fraud booked for defamation)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.