Sushant case | सुशांतच्या घरी 13 जूनला कोणताही पार्टी नव्हती, शेजाऱ्यांच्या माहितीने ट्विस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं लागण्याची शक्यता आहे (Statement of neighbour of Sushant Singh Rajput).

Sushant case | सुशांतच्या घरी 13 जूनला कोणताही पार्टी नव्हती, शेजाऱ्यांच्या माहितीने ट्विस्ट
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 6:43 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं लागण्याची शक्यता आहे (Statement of neighbour of Sushant Singh Rajput). सुशांतच्या घरी 13 जूनला एक पार्टी झाल्याचा दावा सुरुवातीपासून करण्यात आला. मात्र, सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार 13 जूनला सुशांतच्या घरातील लाईट लवकर बंद झाल्या होत्या. तसेच त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, अशी माहिती या महिलेने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयपुढे या प्रकरणाचा उलगडा करण्याचा नवं आव्हान आहे.

या महिलेने सांगितलं, “सुशांतच्या घरातील सर्व लाईट 13 जून रोजी साडेदहा पावणेअकरा वाजल्याच्या सुमारासच बंद करण्यात आल्या होत्या. केवळ किचनमधील लाईट बंद होती. त्याच्या घरात इतक्या लवकर अशा पद्धतीने लाईट बंद होत नसे. तो उशिरापर्यंत जागायचा. मात्र, त्या दिवशी माध्यमांमध्ये जसं सांगितलं जात आहे की पार्टी होती, तशी कोणतीही पार्टी नव्हती.”

सिद्धार्थ पिठाणीची चौकशी

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी हा सुशांत सोबत राहत होता. घटनेच्या दिवशी तो घरीच होता. त्यामुळे सीबीआय सुशांतबद्दल आणि त्याच्या आत्महत्येबद्दल त्याची चौकशी करत आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांकडून आज फॉरेन्सिक तपासही सुरु आहे. 14 जूनला घटना कशी घडली याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुशांतच्या वजनाचा पुतळा आणून सीबीआय अधिकाऱ्यांनी घटनेचं नाट्य रुपांतर करुन घटना समजून घेतली.

सीबीआयचे अधिकारी गेल्या 2 दिवसांपासून सुशांतचा नोकर नीरज सिंग याची चौकशी करत आहेत. नीरजकडे महत्वाची माहिती आहे. घटनेच्या दिवशी नीरज त्या ठिकाणी होता. त्यामुळे त्याच्याकडून तपासाचा दुवा मिळू शकतो,असं सीबीआयच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्याची सतत चौकशी सुरु आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेली सीबीआय टीम अॅक्शन मोडमध्ये आहे. सीबीआय पथकाने कालपासून तपासाला सुरुवात केली आहे. आज सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात तर दुसरी टीम वांद्रे पोलीस स्थानकात दाखल झाली.  त्याआधी सीबीआयची फॉरेन्सिक टीमही मुंबईत दाखल झाली. डीआरडीओ इथे सीबीआयचं तात्पुरतं कार्यालय आहे.

रिया चक्रवर्तीच्या चौकशीची शक्यता दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्या खटल्यात सीबीआय आज रिया चक्रवर्तीची चौकशी करु शकते. रिया सध्या तिच्या मुंबईतील घरी आहे. रियाला अद्याप चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही. त्याआधी सीबीआयने काल रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची चौकशी केली.

पुतळा लटकवून सीन रिक्रिएट

सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा घरात फासावर लटकवून सीबीआयने क्राईम सीन रिक्रिएट केला. यात सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमकं अंतर किती आहे? 6 फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते, की खाली याची सीबीआय खातरजमा करणार आहे.

फॉरेंसिक टीम सीबीआयसोबत असेल. पोस्टमार्टेम, विसेरा, घरात उपस्थित असलेले चार साक्षीदार या सगळ्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

Sushant Singh Rajput case | सीबीआयची टीम अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई पोलिसांकडून डायरी, मोबाईल, लॅपटॉप सुपूर्द

सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार

संबंधित व्हिडीओ :

Statement of neighbour of Sushant Singh Rajput

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.