‘स्त्री-पुरुष समान हे मी मानत नाही’, महागुरू सचिन पिळगावकरांचे विधान चर्चेत
महागुरू सचिन पिळगावकर यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्त्री-पुरुष समानता या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. आता ते नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया...

नुकताच एका वेगळ्या विषयावर आधारित ‘स्थळ’ हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केले आहे. या चित्रपटात स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महागुरु सचिन पिळगावकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘स्त्री-पुरुष समान हे मी मानत नाही’ असे म्हटले आहे. त्यांचे हे विधान ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत. आता नेमकं ते काय म्हणाले चला जाणून घेऊया…
सचिन पिळगावकर यांनी नुकताच मिरची मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्त्री-पुरुष समानतेबद्दल भाष्य केले. “आपल्याकडे असे म्हणतात की, स्त्री आणि पुरुष समान आहेत. तुम्ही त्यांना समान वागवले पाहिजे. स्त्रियांना तुम्ही खालच्या दर्जाला ठेवता आणि पुरुषांना वरचा दर्जा देता. तर ते तसे नाही आहे. स्त्री आणि पुरुष समान आहेत, हे मी मनात नाही. कारण स्त्री ही सर्वार्थाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. स्त्रीचे स्थान वर आहे आणि पुरुषाचे स्थान तिच्यापेक्षा खाली आहे. आपण हे मानलेच पाहिजे. परमेश्वरानेही हे सिद्ध करुन ठेवले आहे. कारण आई बनण्याचे सौभाग्य त्याने फक्त आणि फक्त स्त्रीला दिले आहे. दुसऱ्या कुणाला ते दिलेले नाही. यातून हे सिद्ध होते की, स्त्री ही श्रेष्ठ आहे आणि ते लोकांनीही मानले पाहिजे” असे सचिन पिळगावकर म्हणाले.
वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?




पुढे ते म्हणाले की पुरुषांना हे माहिती होते म्हणून त्यांनी स्त्रीयांना घरात बसवले. “बरं पुरुषाला हे माहिती नव्हते अशातला भाग नाही. पुरुषाला हे सर्व माहिती होते. खूप पुर्वीपासून माहिती होते. पुरुषाला कळाले होते की, ही आपल्या पेक्षा खूप शक्तिशाली आहे. म्हणून त्याने काय केले तर तिला घरी बसवले. मुले सांभाळा, जेवण करा, घरची साफसफाई करा ही कामे तिला दिली. बाकीची बाहेरची कामे मी पाहीन. बाकी दुनियेत तो जाणार पण तिने घराच्या बाहेर पडायचे नाही. कारण ती घराबाहेर पडली तर तिला नवीन संधी मिळणार. तिला शिकता येणार, तिला योग्य-अयोग्य समजणार आणि तिला जर समजले तर ती पुरुषावर वर्चस्व करणार” असे सचिन म्हणाले.
आपल्या समाजात महिला का शिकत नाहीत याविषयी बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले, “या सगळ्या प्रथा त्यामुळेच सुरू झाल्या की, मुलीने शिकून करायचं काय? शेवटी लग्नच तर करायचं आहे. पोरंबाळं तर सांभाळायची आहेत. धुणीभांडी तर करायची आहेत. हेच काम आहे बाईचं… दूसरं काय काम आहे? लाज नाही वाटत. तुम्ही असं स्त्रियांना वागवता. त्यामुळे मी याच्या विरुद्ध आहे”