‘पुष्पा 2’चा अभिनेता अल्लू अर्जुन याच्या घरावर दगडफेक, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची धरपकड
पुष्पा - 2 चा वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. या चित्रपटाचा सुपरस्टार अल्लू अर्जून याच्या घरावर आज काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि निर्दशने केली आहे. या प्रकरणात JAC पक्षाच्या नेत्यांवर आरोप असून पोलिसांना काही जणांना अटक देखील केले आहे.
तेलगू सुपर स्टार अल्लू अर्जून याच्या ‘पुष्पा-2’ चित्रपटाने एकीकडे सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. दर दुसरीकडे चित्रपटाच्या प्रिमियर शोच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला ठार झाल्याने वाद देखील निर्माण झाला आहे. या महिलेचा लहान मुलगा अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहे. दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आणि एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी अभिनेत्यावर टीका केल्यानंतर आज हैदराबाद येथील जुबली हिल्स स्थित अभिनेत्याच्या घराबाहेर अज्ञात लोकांनी दगडफेक आणि निदर्शने केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
कालच अभिनेता अल्लू अर्जून याने पत्रकार परिषदत घेत आपली बाजू मांडली आहे. प्रिमियरच्या दिवशी संध्या थिएटरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेबद्दल हा एक अपघात होता. मला या घटनेत मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती असल्याचे अभिनेता अल्लू अर्जून याने स्पष्ट केले होते. त्याने आपल्या चाहत्यांनाही समाजमाध्यमावर कोणतीही द्वेष किंवा शिवीगाळ करणारी भाषा वापरु नका असे आवाहन केले होते. काही लोकांकडून आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न देखील सुरु असल्याचे अल्लू अर्जून याने म्हटले होते.
अभिनेता अल्लू अर्जून याने काल प्रथमच पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. हा एक केवळ अपघात होता. त्याला कोणीही जबाबदार नाही. माझी त्या कुटुंबाबद्दल सहानुभूती आहे. मी कोणावरही आरोप करु इच्छीत नाही, परंतू माझी बदनामी सुरु आहे. माझ्याबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे. मी झालेल्या प्रकाराने व्यथित असून माफी मागितली आहे.हा काही कोणता रोड शो नव्हता. या संदर्भात चुकीची माहिती पसरविली जात आहे. तेलंगणाच्या विधान सभेत काल अल्लू अर्जून याच्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी टीका केली होती. त्यानंतर अल्लू अर्जून याने प्रथमच मीडियासमोर आपली बाजू मांडली होती.
सीएम रेवंत रेड्डी आणि अकबरुद्दीन ओवैसी काय म्हणाले ?
तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर टीका केली होती. अभिनेता या दुर्घटनेबाबत बेफिकीर होता. मृत्यू झाल्याचे सांगूनही थिएटरच्या बाहेर जात नव्हता. पूष्पा – 2 च्या प्रिमीअरचा उल्लेख करत रेवंत रेड्डी यांनी सांगितले की,’ दुर्दैवी घटना घडलेल्या कुटुंबाची महिन्याची कमाई तीस हजार आहे.परंतू त्यांनी तीन हजार रुपयांचे तिकीट काढले होते. कारण त्यांच्या मुलाला अल्लू अर्जून आवडतो. ‘
तर एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन यांनी सांगितले की मी त्या अभिनेत्याचे नाव घेऊ इच्छीत नाही. परंतू माझ्या माहिती प्रमाणे जेव्हा त्या स्टारला थिएटर बाहेर चेंगराचेंगरी झाली असून त्यात एकाचा मृत्यू आणि दोन मुले जखमी झाल्याचे सांगितले तेव्हा तो स्टार हसत म्हणाला की चित्रपट आता हिट होणार आहे…’