Suhana Khan | शाहरुखच्या लेकीची मित्र-मैत्रिणींसोबत धमाल पार्टी, पाहा सुहानाचा बोल्ड अंदाज!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) दोन्ही मुले नेहमीच चर्चेत असतात. शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

Suhana Khan | शाहरुखच्या लेकीची मित्र-मैत्रिणींसोबत धमाल पार्टी, पाहा सुहानाचा बोल्ड अंदाज!
सुहाना खान'
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 1:48 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) दोन्ही मुले नेहमीच चर्चेत असतात. शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सुहानाची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशा परिस्थितीत सुहानाने आता आपला नवीन फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या मित्रांसह दिसली आहे. शाहरुखची लेक सुहाना खान अमेरिकेत शिकत आहे. जिथे ती बर्‍याचदा आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते (Suhana Khan shares photo on social media while partying with friends).

सुहानाच्या या नवीन फोटोंमध्ये तिने सॅटीन ब्लू-स्कर्ट आणि ट्यूब टॉप घातला आहे. तर, फोटोत तिने आपल्या मित्राला मिठी मारली आहे. सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यास करत आहे. सुहानाला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये काम करण्याची आवड आहे. इतकेच नाही तर, तिने अनेक मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहेत. सुहानाची जिवलग मैत्रीण असणाऱ्या अभिनेत्री अनन्या पांडेनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. एका मुलाखती दरम्यान, अनन्या सुहानाबद्दल बोलताना म्हणाली की, सुहाना सुरुवातीपासूनच अत्यंत हुशार आहे आणि अभ्यास संपल्यानंतर ती नक्कीच अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल.

पाहा सुहानाचा फोटो

Suhana khan

सुहाना खान’

मुलांनी अभिनय शिकावा…

सुहाना खानचे वडील अर्थात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची इच्छा आहे की, सुहानाने आता तिचे काम अधिक योग्यरित्या शिकावे. शाहरुख खानने आपल्या एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, सुहानाला अभिनेत्री व्हायचे असेल, तर तिने पहिले 3-4 वर्षे अभिनय शिकले पाहिजे. तो म्हणाला होता, मला माहित आहे की, इंडस्ट्रीतील माझ्या बर्‍याच मित्रांना माझ्या मुलांनी लगेच अभिनय करण्यास सुरुवात करावी, अशी इच्छा आहे. पण, मला नेहमीच वाटते की, त्यांनी आता लगेच अभिनय करू नये (Suhana Khan shares photo on social media while partying with friends).

सुहानाचे ट्रोलर्सना उत्तर

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

(Suhana Khan shares photo on social media while partying with friends)

सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. पण काही दिवसांपूर्वी एका फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. ट्रोलर्सनी तिला पर्सनल चॅटमध्ये तिचा रंग काळा असल्याचे म्हणत तिला हिणवले होते. त्या चॅट्सचे स्क्रीन शॉट तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर टाकले होते. सोबतच तिने मी माझ्या रंगावर खूश असल्याचे म्हणत वर्णभेद करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.

‘पठाण’च्या चित्रीकरणात व्यस्त शाहरुख

त्याचवेळी शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, बॉलिवूडचा किंग खान सध्या दुबईमध्ये त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुख खानसमवेत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम दिसणार आहेत. त्याचबरोबर हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

(Suhana Khan shares photo on social media while partying with friends)

हेही वाचा :

कोरोना संसर्गानंतरही शूटिंगमध्ये सहभागी, बॉलिवूड अभिनेत्रीवर गुन्हा

RRR | राजामौलींच्या ‘आरआरआर’मध्ये अशी दिसणार आलियाने साकारलेली ‘सीता’, पाहा तिचा खास लूक…

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.