मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि जॅकलीन फर्नांडीज (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. २०० मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकल्यानंतर जॅकलिन आणि नोरा यांनी देखील एकमेकींवर आरोप केले. २०० कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर तुरुंगात आहे. याप्रकरणी रोज नवीन अपडेट समोर येत आहे. आता सुकेश चंद्रशेखर याने नोराबद्दल मोठ सत्य उघड केलं आहे. ज्यामुळे नोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नोरा हिने खुलासा केला होता की, सुकेशने गर्लफ्रेंड बणण्यासाठी भव्य घर आणि लग्जरी लाईफ स्टाईल देण्याचा वचन दिलं होतं. नोराच्या या वक्तव्यानंतर सुकेशने केलेलं वक्तव्य देखील समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश याने नोराला मोरक्कोमध्ये घर खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते.
याबद्दल सुकेश आज म्हणाला, ‘नोराने मोरक्कोमध्ये कुटुंबासाठी घर खरेदी करण्यासाठी माझ्याकडून मोठी रक्कम घेतली होती. नोराला एक कार देखील हवी होती. तिला स्वतःची कार बदलायची होती. त्यासाठी सीएलए प्रचंड स्वस्त होती. म्हणून तिला मी सीएलए कार दिली नाही. मी नोराला रेंज रोव्हर देणार होतो. पण तेव्हा रेंज रोव्हर कार स्टॉकमध्ये नव्हती. तर मी तिला तात्काळ बीएमडब्ल्यू एस सीरिज दिली. ‘
सुकेश पुढे म्हणाला, ‘नोरा ज्याप्रकारे दावा करत आहे, तसा तिच्यात आणि माझ्यामध्ये कधीही कोणताही व्यवहार झाला नव्हता. एकदा ती माझ्या चिंता फाउंडेशनद्वारे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. ज्यासाठी तिच्या एजेन्सीला ऑफिशियली पेमेंट केलं होतं.’ असा खुलासा देखील सुकेश याने केला.
जॅकलिन हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता सुकेश
जॅकलिन हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा देखील सुकेश याने केला होता. एवढंच नाही तर, नोराला जॅकलिन विषयी ईर्ष्या होती असं देखील सुकेश म्हणाला. त्यामुळे आता जॅकलिन आणि नोरा देखील २०० मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.