ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच गोविंदा आणि त्याची बायकोही वेगळे राहत असल्याची चर्चा… नेमकं काय घडलं?
बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने नुकताच खुलासा केला आहे की ते दोघेही वेगळ्या घरात राहतात. सुनीता आपल्या मुलांसह वेगळ्या घरात राहते, तर गोविंदा दुसऱ्या घरात राहतो. सुनीताने यामागचे कारणही सांगितले आहे.
अभिनेता गोविंदा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. गोविंदाच्या खाजगी आयुष्याची तर नेहमीच चर्चा होत असते. तसेच गोविंदासोबत त्याची पत्नी सुनीता आहुजा देखील नेहमी चर्चेत असतेय. तिच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल नेहमीच सगळे बोलत असतात. दरम्यान सुनीता आहुजाने केलेल्या नुकत्याच एका गोष्टीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
पती-पत्नी राहतात वेग-वेगळ्या घरात
दरम्यान सुनीताने खुलासा केला आहे की ती आणि गोविंदा दोघेही एकाच घरात एकत्र राहत नसून दोघेही वेग-वेगळ्या घरात राहतात. दोघे एकत्र राहत नाहीत कारण गोविंदाला लोकांना जमवून त्यांच्याशी बोलणे आवडते. मात्र, सुनीताला तिचा तिचा वेळ घालवणं आवडतं.
तसेच, गोविंदाच्या अनेक कामानिमित्त मिटींगही असतात. त्याला अनेक प्रचंड उशीर होतो. त्यामुळे सुनीता मुलांसह एका अपार्टमेंटमध्ये राहते, तर गोविंदा ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्याच अपार्टमेंटसमोर तिचाही बंगला आहे.
“गोविंदाला लोक जमवून गप्पा मारायला आवडताता, मला नाही”
एका मुलाखतीत सुनीताने म्हटलं आहे, “त्याला मीटिंगला जायला उशीर होतो. त्याला बोलायला आवडते. तो 10 लोकांना एकत्र करेल आणि त्यांच्याशी बराच वेळ बोलेल. मी माझ्या मुलगा आणि मुलीसोबत राहते. जास्त बोलून तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवता” असे मत सुनीतने व्यक्त केलं आहे.
गोविंदाकडे वेळ नाही
सुनीतानं असंही म्हटलं की ‘मी खूप लवकर भावूक होते. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या नवऱ्याविषयी नेहमी विचार करते. मात्र, हे देखील आहे की मी खूप स्ट्रॉंग आहे असं दिसतं. पण मी मूर्ख नाही.’ असं म्हणत ती एकत्र राहत नसली तरी तिला तिच्या गोविंदा आणि घराविषयी खूप काळजी असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
सुनीतने पुढे सांगितले की, तिला बाहेर फिरायला जायला आवडते, पण गोविंदाकडे या गोष्टींसाठी वेळ नाही. गोविंदा सुट्टीवर जात नाहीत. गोविंदाने आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या कामासाठी दिला असल्याचंही सुनीताने म्हटलं आहे. एकंदरीत सुनीताने पती गोविंदा तिला जास्त वेळ देत नसल्याची आणि त्याचा वेळ हा त्याच्या कामातच जात असल्याची तक्रार केली आहे.