गोविंदाबद्दल विचारताच सुनीताने केलं तोंड वाकडं; चाहते भडकले
अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान सुनीता आहुजा आणि तिचा मुलगा उपस्थित होता मात्र गोविंदा त्यांच्यासोबत नसल्यामुळे पापाराझींनी गोविंदाबद्दल विचारल असता. तिने अशी काही प्रतिक्रिया दिली की सर्वांनाच आश्चर्य वाटलं. घटस्फोटाच्या अफवांदरम्यानच तिचा असा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने या जोडप्यात अजूनही सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून त्याची पत्नी सुनीता आहुजासोबत घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, अभिनेत्याची पत्नी सुनीता आहुजा तिच्या मुला यशवर्धनसोबत एका पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होती. रेड कार्पेटवर तिला आणि मुलाला पाहून पापाराझींनी तिला गोविंदा कुठे आहे असे विचारलं. तेव्हा सुनीताने जी काही प्रतिक्रिया दिली ते पाहून सर्वच हैराण झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की हा व्हिडीओ पाहून चाहतेही भडकले आहेत.
सुनीताच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं
एका अवॉर्ड शोमध्ये सुनीता आहुजा अतिशय सुंदर अशा गेटअपमध्ये पोहोचली होती. तिने स्टायलिश असा शिमरी शर्ट आणि पँट घातली होती. सुनीता तिचा मुलगा यशवर्धन आहुजासोबत फोटोसाठी पोज देताना दिसली. सुनीता आहुजाने तिच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गोविंदाचं नाव काढताच सुनीताची अजब प्रतिक्रिया
यावेळी, पापाराझीने तिला गोविंद सर कुठे आहेत असे विचारले, सुरुवातीला सुनीताने दुर्लक्ष केलं आणि नंतर ‘काय’ असं म्हटलं आणि पुढे निघून गेली. मग कॅमेरामन म्हणाला की आम्हाला ‘हिरो नंबर 1’ ची आठवण येत आहे, मग सुनीतानेही त्यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की “हो आम्हालाही त्याची आठवण येत आहे आणि ती हसली” पण एकंदरीतच तिने ज्यापद्धतीने गोविंदाचं नाव काढताच प्रतिक्रिया दिली ती कोणालाही आवडली नाही.
View this post on Instagram
सुनीताची प्रतिक्रिया पाहून चाहते भडकले
सुनीता आहुजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली की “आजही त्यांच्यात काही ठीक नाही वाटतं” तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, “तुम्ही कोणीही असलात तरी गोविंदाला असे दुर्लक्ष करू नका”, गोविंदाच्या चाहत्यांना सुनीता आहुजाची ही प्रतिक्रिया आवडली नसून सर्वांनीच त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.